काकूबाई ते मॅडम करिअर प्रवास

Career journey from auntie to madam of a Indian woman
Career journey from auntie to madam - 

कंपनीत मॅनेजर म्हणून अनिता वहिनी दिसताच विजय चकित झाला. वहिनी अशी हाक मारताच अनिताने वहिनी घरी, येथे मला मॅडम म्हणायचं, असे उत्तर देताच हा अपमान झाला का सूचना? हे विजयला कळलेच नाही. सारा स्टाफ मात्र विजयकडे बघून गालातल्या गालात हसत होता.

आंटी ते मॅडम: एक परिवर्तनीय करिअरचा प्रवास

जवळजवळ ६-७ वर्षापूर्वी अजय आणि अनिताचा विवाह झाला. वेगळ्या कंपनीत काम करणारा अजय हा विजयचा खास मित्र, त्यामुळे त्याच्या विवाहात सर्वातजास्त मदत विजयनेच केली होती. विवाहाच्या वेळी जेव्हा विजयला कळाले की अनिता फक्त १२वी पास असून खेडेगावात मोठी झाली आहे, तेव्हा त्याने याबाबत अजयकडे खुलासा मागितला. स्वत: एक इंजिनीअर असतांना या बारावी पास काकुबाई मुलीशी विवाह का? असे विचारल्यावर, माझे कुणाशी प्रेमप्रकरण नाही, म्हणून मी माझ्या आई-वडीलांनी पसंत केलेल्या मुलीशी विवाह केला, त्यात मला गैर काही वाटत नाही, बायकोला पुढे शिकविता येईल, असे मिळालेले अजयचे उत्तर तेव्हा विजयला पटले नव्हते. त्याने कमी शिक्षण हा चेष्टेचा विषय बनविला कारण त्याच्या म्हणण्यानुसार एकदा मुलंबाळांच्या सोबत संसार सुरू झालातर उच्च शिक्षण शक्यच नसते. हे ऐकून तेव्हा अजयचा इगो दुखविला गेला होता. येत्या १० वर्षाच्या आत बायकोला शिकवून तुझ्यापेक्षा चांगल करिअर तिला मिळवून देतो, असा निश्चय अजनने तेव्हा विजयसमोर बोलून दाखविला. हा निश्चयच आज अनिताला या स्तरावर बघून विजयच्या कानात घुमत होता.

विजयने संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर अजयला फोन लावला. गेल्या अनेक वषार्ंपासून अजयची नेहमी बदली होत असल्यामुळे तो फक्त फोनवरूनच संपर्कात होता. त्याचा पत्ता मिळाल्यावर रविवारी विजय अजयच्या घरी पोहचला. गेल्या गेल्या, येथे वहिनी म्हटले तरी चालेल, असा टोला अनिताने मारला. अजयने त्याचे चांगले स्वागत केले. विजयने नसंकोचता निश्चय पूर्ण केल्याबद्दल अजयचे अभिनंदन केले आणि हे कसे शक्य झाले याबाबत जिज्ञासा दाखविली. खरं तर हे सर्व मुक्त विद्यापीठांच्या दुरस्थ शिक्षण पद्धतीमुळचे शक्य झाले. विवाह झाल्यावर अजयने लगेचच अनिताची ग्रॅज्युएशनसाठी मुक्त विद्यापीठात ऍडमिशन घेतली. नियमीत कॉलेज करण्याची गरज नव्हती. ऑन लाईन शिक्षण किंवा फक्त रविवारी क्लास, घरपोच पुस्तके यामुळे तिचे ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण सहज झाले. पुढे तिला एमबीए करण्याचा विचार मनात आला, महानगरात करिअर करायचे तर इंग्रजीचे ज्ञान आवश्यक, म्हणून तिला पार्ट टाईम इंग्लिश स्पिकींग कोर्स लावले, घरी जास्तीतजास्त इंग्रजी बालण्याचा सराव केला. त्यामुळे अनिताने अतिशय सुलभपणे एमबीए पूर्ण करून कंपनीत जॉब मिळविला. अजयचा खुलासा ऐकून विजयाला दुरस्थ शिक्षणाचे महत्त्व पटले. त्याची बायको कधीपासून पोस्ट ग्रॅज्यूएशन करायची म्हणत होती, तिची आता मुक्त विद्यापीठात ऍडमिशन करू, असा लगेच विचारही विजयच्या मनात आला.

शिक्षण पूर्ण न होताच आपल्या समाजात मुलींचे विवाह होतात. परंतु विवाह हा शिक्षणाचा फुलस्टॉप न समजता अजयने अनिताला शिक्षणासाठी पूर्ण सहकार्य देण्याचा निश्चय केला. आज शिकलेली अनिता या आधुनिक जीवनशैलीत अभिमानाने जगत आहे. योग्यवेळी केलेला निश्चयच यासाठी कारणीभूत ठरला.

दूरस्थ शिक्षणाचे महत्त्व

पारंपारिक शिक्षण व्यवस्थेसोबत दूरशिक्षण ही भारतातील एक महत्त्वाची शैक्षणिक पद्धत म्हणून उदयास आली आहे. त्याचे महत्त्व अधोरेखित करणारे काही महत्त्वाचे मुद्दे येथे आहेत:

  • सुलभता: भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात दूरशिक्षण महत्त्वाचे आहे, जेथे अनेक प्रदेशांमध्ये पुरेशा शैक्षणिक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. दूरस्थ शिक्षणामुळे भौगोलिक अडथळे दूर होतात, ज्यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थलांतर न करता दर्जेदार शिक्षण घेता येते. 
  • लवचिकता: हे लवचिक शिक्षण वेळापत्रक ऑफर करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासोबत त्यांचे काम, कौटुंबिक जबाबदार्‍या किंवा इतर कामे सांभाळून शिक्षण पूर्ण करता येते. 
  • कमी फी: पारंपारिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत डिस्टन्स लर्निंग प्रोग्राममध्ये अनेकदा कमी शिकवणी शुल्क असते. याव्यतिरिक्त, विद्यार्थी वाहतूक, निवास इत्यादी संबंधित इतर खर्च वाचतात.
  • वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम: व्यावसायिक प्रशिक्षणापासून ते प्रगत पदवीपर्यंत अनेक अभ्यासक्रम आणि कार्यक्रम दूरस्थ शिक्षणाद्वारे उपलब्ध आहेत. ही विविधता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी आणि करिअरची उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यास उपयुक्त ठरतेे
  • तांत्रिक एकत्रीकरण: दूरस्थ शिक्षणामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन संसाधनांचा वापर डिजिटल साक्षरता वाढवतो आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान जगासाठी तयार करतो. हे मल्टीमीडिया सामग्री, व्हर्च्युअल क्लासरूम आणि ऑनलाइन पद्धतींद्वारे शिक्षण घेण्याचा उत्तम अनुभव देतात.
  • शिक्षणातील सातत्य: नैसर्गिक आपत्ती, साथीचे रोग अशा समस्यांमुळे दुरस्थ शिक्षण घेण्यात अडथळा येत नाही.  
  • आजीवन शिक्षण: दुरस्थ शिक्षण पद्धतीत अटी आणि नियम पारंपारिक शिक्षण पद्धतींपेक्षा सुलभ असतात. त्यामुळे सर्व वयोगटातील आणि सर्व जाती धर्मातील उमेदवारांना हे शिक्षण सहज घेता येते.

पूर्वी दुरस्थ शिक्षण पद्धत केवळ टपालाद्वारे वाचन साहित्य पाठवून पूर्ण केली जात होती. आता मात्र या पद्धतीत खालील प्रमाणे अनेक बदल करून ही पद्धती आधनिक करण्यात आली आहे. 

  • १. ऑनलाइन अभ्यासक्रम: व्हर्च्युअल क्लासरूम, व्हिडिओ व्याख्याने आणि ऑनलाइन मूल्यांकनांसह वेब-आधारित अभ्यासक्रम.
  • २. पत्रव्यवहार अभ्यासक्रम: विद्यार्थ्यांना मेलद्वारे पाठविलेले छापील अभ्यास साहित्य, असाइनमेंट आणि परीक्षा मेलद्वारे किंवा ऑनलाइनद्वारे घेतल्या जातात.
  • ३. ओपन लर्निंग: ऑनलाइन संसाधने, ई-पुस्तके आणि ऑडिओ/व्हिडिओ लेक्चर्सद्वारे स्वयं-वेगवान शिक्षण.
  • ४. व्हर्च्युअल क्लासरूम: व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंग सॉफ्टवेअरद्वारे थेट ऑनलाइन वर्ग आयोजित केले जातात.
  • ५. मोबाइल शिक्षण: मोबाइल ऍप्स, एसएमएस आणि इतर मोबाइल उपकरणांद्वारे शिकणे.
  • ६. ई-लर्निंग प्लॅटफॉर्म: अभ्यासक्रम, ट्यूटोरियल आणि पदवी कार्यक्रम ऑफर करणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म. 

भारतातील काही लोकप्रिय दूरस्थ शिक्षण संस्थां

१. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU)
२. अण्णा विद्यापीठ दूरस्थ शिक्षण
३. सिम्बायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL)
४. मुंबई विद्यापीठ - इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंग (IDOL)
५. दिल्ली विद्यापीठ - स्कूल ऑफ ओपन लर्निंग (SOL)

या संस्था व्यवसाय, तंत्रज्ञान, कला आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रात पदवीपूर्व ते पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा आणि प्रमाणपत्रांपर्यंत अनेक कार्यक्रम देतात.

दुरस्थ शिक्षण हे तंत्रज्ञानयुक्त आणि नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती बनले आहे.दूरस्थ शिक्षणाने शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे आणि जीवनाच्या सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी संधींचे जग खुले केले आहे. त्याच्या लवचिकता, सुलभता आणि परवडण्यामुळे, दूरस्थ शिक्षणाचा अनेकांना फायदा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने

{Ads}


इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या

{Ads}

.
amazon वर एकदा चेक तर करा
सर्व आपल्या बजेटमध्येच आहे,
Watches- Men     Women
Footwear- Men      Women
.


.
amazon वर आज कोणत्या ऑफर्स
.