केवायसी आवश्यकता: महत्त्व आणि प्रकार

KYC Requirement: Importance Types
KYC- Know Your Customer

बँकेचे खातेदार म्हणजेच कस्टमर जाणून घेणे, त्यांची ओळख सत्यापित करून घेणे ही बँकिंग सेक्टरमधील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी त्यांना फायनान्शियल सेवा प्रदान करण्यापूर्वी कस्टमरची ओळख व्हेरिफाय करण्यात मदत करते. त्यालाच केवायसी असे म्हटले जाते. कोणत्याही फायनान्शियल संस्थेसाठी केवायसी ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. वित्तीय संस्थांनी त्यांच्या ग्राहकांच्या ओळखी आणि पार्श्वभूमीची पडताळणी करण्यासाठी केवायसी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वित्तीय गुन्हेगारी, मनी लॉंड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा यांचा सामना करण्यासाठी तयार केली गेली आहे. २००४ पासून, भारतीय रिझर्व्ह बँकेने केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय बँक खाते, ट्रेडिंग खाते किंवा डीमॅट खाते उघडण्यास मनाई केली आहे.

{tocify} $title={Table of Contents}

KYC - तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या : हे महत्त्वाचे का आहे आणि वर्गीकरण

कोबरापोस्ट या स्टींग ऑपरेशनमुळे काही बँकातील अनियमितता सार्‍या देशाने बघितली. किती सहजपणे बँक आणि गाहकांमार्फत नियमांचे उल्लंघन होऊ शकते, केवायसीचे नियम मोडून मनी लॉंड्रिंग होऊ शकते हे या ऑपरेशनमुळे समजले. रिझर्व्ह बंंकेने या सर्व बाबींची तपासणी केली आणि यावर कोणत्या उपाययोजना करता येतील यासंबधी वित्त मंत्रालयाशी चर्चा केली. केवायसीचे नियम अधिक कठोरपणे लागू करावे आणि त्यांचे काटेकोरपणे पालन व्हावे यावर आता रिझर्ब्ह बँक आणि वित्त मंत्रालयाचे एकमत झाले आहे. त्यामुळे बॅकिंग व्यवहारांमध्ये होणारी फसवणूक टळू शकेल आणि बँकांच्या आणखी पारदर्शकता येऊ शकेल. यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना केवायसी फॉर्म भरून घेणे सक्तीचे केले आहे.

केवायसी बद्दल सर्व माहिती 

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने केवायसी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केवायसी धोरण १९४९ च्या बँकिंग नियमन कायद्यानुसार लागू करण्यात आले होते. पुढील लेख केवायसीचा अर्थ, त्याची उद्दिष्टे, फायदे, केवायसी प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे, ऑनलाईन आणि ऑफलाईन केवायसी आदी समजून घेण्यात मदत करेल.

$ads={1}

केवायसी म्हणजे काय?

केवायसी KYC म्हणजे नो योर कस्टमर किंवा नो युअर कस्टमर Know your customer असे आहे. ही एक पद्धत आहे ज्याद्वारे विविध वित्तीय संस्था (जसे की बँक, विमा, कर्ज देणार्‍या संस्था इ.) त्यांच्या ग्राहकांची वैधता सत्यापित करू शकतात. थोडक्यात, केवायसी ही ग्राहकांची ओळख व्हेरिफाय करण्याची तसेच त्यांच्याशी संबंधित संभाव्य जोखीमांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया आहे. नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर संबंधित तपशीलांसह केवायसी प्रक्रिया योग्यरित्या अंमलात आणण्यासाठी वित्तीय संस्थांना त्यांच्या ग्राहकांकडून काही माहिती सत्यापित करणे आवश्यक आहे. ही माहिती सरकारने जारी केलेली आयडी किंवा थर्ड-पार्टी डाटाबेस सारख्या विश्वसनीय स्रोतांचा वापर करून पडताळली जाते. वित्तीय संस्थांना त्यांच्या विशिष्ट सेवा आणि जोखीम मूल्यांकन धोरणांनुसार उच्च-जोखीम ग्राहकांसाठी अतिरिक्त तपासणी करणे देखील आवश्यक असू शकते.

तुम्हाला बँक खाते उघडायचे असेल, शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल, तुमचे पैसे मुदत ठेवींमध्ये ठेवायचे असतील किंवा कर्जासाठी अर्ज करायचा असेल, तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी वित्तीय संस्थेला तुम्हाला काही वैयक्तिक किंवा व्यावसायिक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, केवायसी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतीही वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांशी कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकत नाही. केवायसी प्रक्रियेमध्ये सामान्यपणे ग्राहकांविषयी माहिती जसे की नाव, पत्ता, संपर्क तपशील, जन्मतारीख, निधीचा स्त्रोत इ. गोष्टी गोळा करण्याचा समावेश होतो, अशा प्रकारे बँकेला ग्राहकाची पार्श्वभूमी समजण्यास मदत होते.

केवायसीचे महत्त्व

केवायसीचा अर्जाची बंँकेतील ग्राहकांनी अजिबात भिती बाळगण्याची गरज नसते. कारण केवायसीचा एक सोपा अर्ज असून भरण्यासही सोपा असतो. यावर आपले नाव, पत्ता, अकाऊंट नंबर, पॅन नंबर आदी माहिती भरावी लागते आणि एक फोटोही लावावा लागतो. केवायसीचे महत्त्व खालीप्रकारे अधोरेखित करता येईल.

  • केवायसी प्रक्रिया अमलात आणण्याचे ध्येय म्हणजे विशिष्ट ग्राहक माहिती संकलित करणे, ती माहिती साठवणे आणि अद्ययावत करून फायनान्शियल सिस्टीममध्ये अधिक पारदर्शकता निर्माण करण्यात मदत करणे असे आहे. त्यामुळे वित्तीय संस्थांना संशयास्पद ट्रान्झॅक्शन अधिक सहजपणे शोधता येतात.
  • आर्थिक क्षेत्रातील गुन्हेगारी रोखणे आणि त्या गुन्हेगारीपासून वित्तीय संस्थांचे संरक्षण करण्यासाठी केवायसी अनुपालन हे जागतिक प्रयत्नाचा महत्त्वाचा भाग आहे.
  • केवायसी पडताळणी प्रक्रिया बँकेला हे जाणून घेण्यास मदत करू शकते की तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी निवडलेला पैसा कोणत्याही बेकायदेशीर कामांसाठी नव्हता.
  • केवायसी मुळे बँका आणि इतर वित्तीय संस्थांना त्यांचे ग्राहक वैध आहेत की नाही आणि त्यांचे व्यवहार कायदेशीर आहेत हे निर्धारित करण्यात मदत होते.
  • केवायसी (नो युवर कस्टमर) प्रक्रिया वित्तीय कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास, त्यांना विश्वास निर्माण करण्यास आणि दीर्घकालीन संबंध प्रोत्साहित करण्यास मदत करते.
  • वित्तीय संस्था त्यांचे ग्राहक कोण आहेत हे स्पष्टपणे समजून घेऊन, फसवणूक कमी करू शकतात आणि अधिक जलदपणे संशयास्पद ऍक्टिव्हिटी शोधू शकतात. ही प्रक्रिया व्यवसायांना सुरक्षितपणे आणि सक्षमतेने कार्य करीत आहे याची खात्री करण्यास मदत करते.
  • केवायसीमुळे दहशतवादासाठी वित्तपुरवठा, मनी लॉंड्रिंग आणि बेकायदेशीर भ्रष्टाचार योजनांची अंमलबजावणी रोखण्यासाठी मदत होते.
  • केवायसी मुळे बेनामी खात्यांचा मागोवा घेता येतो आणि वित्तीय संस्थांना उच्च-मूल्याच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवता येते.
  • खातेधारकांची ओळख सुनिश्चित करण्यास आणि संभाव्य फायनान्शियल गुन्ह्यांपासून बँकेचे संरक्षण करण्यास केवायसी मुळ मदत होते.

केवायसी कुठे आणि केव्हा आवश्यक आहे?

खालील परिस्थितींसाठी केवायसी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

बँकांसाठी केवायसी

नवीन खाते उघडण्यासाठी, मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा कर्जाचा अर्ज जमा करण्यासाठी बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही आधीच बँकेचे ग्राहक असाल तर तुमचा डेटा बँकेकडे अगोदरच असता, तेव्हा अगोदर जमा केलेली कागदपत्रे पुन्हा जमा न करता फक्त वाढीव कागदपत्रे केवायसीसाठी जमा करावी लागतात. खरेतर केवायसी ही एक वेळची प्रक्रिया आहे, त्यानंतर तुमची माहिती तुमच्या बँकेच्या डेटाबेसमध्ये साठवली जात असते.

विमा खरेदी करतांना केवायसी

जीवन विमा, वाहन विमा किंवा आरोग्य विमा खरेदी करायचा असेल, केवायसी आवश्यक आहे.

गुंतवणुकीसाठी केवायसी

म्युच्युअल फंडामध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते उघडण्यासाठी, केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

सोने खरेदीसाठीही केवायसी

केवळ बँकेतील खातेदारांनाच नव्हे तर सोने खरेदी करणार्या ग्राहकांनाही आता केवायसी भरावा लागणार आहे. मनी लॉंर्डिंग ऍक्ट २००२ अधिनियम अंतर्गत रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईननुसार यापुढे सोने खरेदीसाठीही केवायसी फॉर्म भरणे अनिवार्य होत आहे. सोन्याच्या खेरदी विक्रीवर दररोज कोट्यावधीची उलाढाल होत असते. या तुलनेत मात्र करप्राप्ती होत नाही, असे शासन स्तरावर निदर्शनास आल्याने शासनाने ही नवीन यंत्रणा ज्वेलरी संचालकांच्या माध्यमातून लावली आहे. ५० हजारापेक्षा जास्त किंमतीचे सोने घेणार्यापासून तर ५ लाखाच्यावर सोने खरेदी करणार्यांची नोंद अनिवार्य होत आहे. त्यात ग्राहकाचे नाव, संपूर्ण पत्ता, इमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक देणे गरजेचे आहे. यासोबत आयडी आणि ऍड्रेस प्रुफसाठी ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटर कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन,रेशन कार्ड, बँक स्टेटमेंट, वीज बील जोडणे गरजेचे होणार आहे. तसेच सोने खरेदी करणार्या ग्राहकाचा व्यवसाय लिहिणेदेखील अनिवार्य आहे.

केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

भारत सरकारनुसार पुढील दस्तऐवज आहेत जे अधिकृतपणे वैध दस्तऐवज म्हणून काम करतात.

१) ओळखीचा पुरावा

  • युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (युआयएन)जसे की मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट.
  • पॅन कार्ड
  • आयडेंटी कार्ड- ओळखपत्रे जी विद्यापीठे किंवा व्यावसायिक संस्थांद्वारे जारी केली जातात.
  • फोटो ओळखपत्र - केंद्र किंवा राज्य सरकार, वैधानिक संस्था. अनुसूचित व्यावसायिक बँका, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा कोणत्याही सार्वजनिक वित्तीय संस्थांद्वारे आणि नियामक प्राधिकरणांद्वारे जारी केलेले ओळखपत्र.

२) पत्त्याचा पुरावा

  • -शिधापत्रिका, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, निवासी मालमत्तेचा भाडेपट्टा किंवा नोंदणीकृत विक्री करार, किंवा घर मालमत्ता विमा कागद
  • -अलीकडील तीन महिन्यांची युटिलिटी बिले जसे की वीज बिल, टेलिफोन बिले किंवा गॅस बिले
  • -अलीकडील तीन महिन्यांच्या बँक पासबुक नोंदी किंवा खाते विवरण
  • -पत्त्यातील बदलासाठी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून साक्षांकन
  • -खालील द्वारे जारी केलेल्या निवासाचा पुरावा: बहुराष्ट्रीय परदेशी बँका, अनुसूचित व्यावसायिक बँका, अनुसूचित सहकारी बँक,राजपत्रित अधिकारी, नोटरी पब्लिक, विधानसभेचे निवडून आलेले प्रतिनिधी, संसद सरकारी संस्था, वैधानिक अधिकारी

बेनामी व्यवहार टाळण्यासाठी ओळखीच्या आणि रहिवासाच्या पुराव्यासह केवायसी अर्ज भरावा लागतो. मात्र खेडे गावातील मजूर किंवा गरीब लोकांकडे असा पुरावा असतोच असे नव्हे. या लोकांनी ग्रामसेवक किंवा तलाठी यांचा दाखला जोडला तरी तो ग्राह्य धरण्याबाबत वित्तीय संस्थांकडे मार्गदर्शक तत्त्वे आहेत. नंतर बँक या ग्राहकांच्या पुराव्याची शहानिशा करून खातेदाराला खाते उघडण्याची परवानगी देउ शकणार आहे.

अल्पवयीन खातेदार-

अल्पवयीन व्यक्तीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असल्यास, खाते चालवणार्‍या व्यक्तीचा आयडी पुरावा सादर करावा लागतो.

केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास

  • केवायसी अर्ज भरण्यासंबधीची सूचना ग्राहकांना एसएमएस, इमेल किंवा बँकेत गेल्यावर मिळू शकणार आहे. हा अर्ज वेळेत न भरल्यास आपल्या खात्यावरील व्यवहार थांबविला जाऊ शकतो.
  • केवायसी मानकांचे पालन करण्यासाठी वित्तीय संस्था जबाबदार आहेत. त्यांचे पालन न केल्यास त्यांना कठोर दंडाला सामोरे जावे लागते.

केवायसी प्रक्रियेचे विविध प्रकार

भारतात खालीलप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या केवायसी प्रक्रिया आहेत.

कागदावर आधारित केवायसी

या प्रकारच्या केवायसी प्रक्रियेसाठी ओळख आणि पत्त्याच्या पुराव्याच्या प्रत्यक्ष आणि स्वयं-साक्षांकित प्रती(सेल्फ अटेस्टेड) सादर करणे आवश्यक आहे. या प्रकारचे केवायसी पूर्ण करण्यासाठी, तुम्ही फंड हाऊसच्या शाखेत, बँक किंवा केआरएमध्ये जाऊन स्वाक्षरी केलेल्या अर्जासह आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन केवायसी

केवायसीचा अर्ज ऑनलाईनही भरता येतो. ऑनलाईन केवायसी व्हेरिफिकेशन ही डिजिटल मार्गांद्वारे व्यक्तीच्या ओळखीची पडताळणी करण्याची प्रक्रिया आहे. या व्हेरिफिकेशनमध्ये सामान्यपणे नाव, जन्मतारीख, पत्ता, फोन नंबर आणि इतर प्रकारच्या ओळखीसारखी वैयक्तिक माहिती संकलित करणे, स्टोअर करणे आणि प्रमाणित करणे समाविष्ट असते. सदर माहिती पासपोर्ट, चालकाचा परवाना किंवा राष्ट्रीय ओळख कार्ड सारख्या कागदपत्रांच्या मदतीने संकलित केली जाते. त्यानंतर प्रदान केलेली माहिती अधिकृत आणि अचूक असल्याची खात्री करण्यासाठी डाटा सत्यापित केला जातो.

बायोमॅट्रिक-आधारित केवायसी

बायोमॅट्रिक-आधारित केवायसीमध्ये ग्राहकांना त्यांची ओळख पडताळण्यासाठी फिंगरप्रिंटसह बायोमेट्रिक डाटा किंवा फेशियल ओळख प्रदान करणे आवश्यक आहे. दहशतवादी वित्तपुरवठा, मनी लॉंडरिंग आणि इतर आर्थिक गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी बायोमॅट्रिक-आधारित केवायसी एक प्रभावी साधन म्हणून काम करते. सद्या पारंपारिक ओळख पद्धतींच्या तुलनेत बायोमेट्रिक्सचा वापर लोकप्रिय झाला आहे. याव्यतिरिक्त, बायोमॅट्रिक्स पद्धती माहितीसाठी चांगली सुरक्षा प्रदान करते कारण ती सहजपणे डुप्लिकेट किंवा चोरीला जाऊ शकत नाही.

आधार-आधारित केवायसी

हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (इकेवायसी) कडून तुमची वैयक्तिक माहिती ऑनलाईन स्वरूपात सत्यापति करून केली जाणारी प्रक्रिया आहे.बायोमेट्रिक किंवा ओटीपी-आधारित पडताळणीसाठी तुम्ही आधार वापरून हे केवायसी पूर्ण करू शकता. ओटीपी आधारित पडताळणीसाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक्ससाठी, प्रमाणित स्कॅनर वापरले जातात. यामध्ये तुमचा १२-अंकी आधार नंबर प्रविष्ट करणे, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल फोनवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) प्राप्त करणे आणि बँक अकाउंट, सिम कार्ड आणि अन्य सेवांचा क्सेस प्रदान करण्यासाठी त्याचा वापर करणे समाविष्ट आहे. या केवायसी प्रक्रिये केवळ खरी व्यक्ती सेवांचा लाभ घेऊ शकते. कागदपत्रांच्या डॉक्युमेंटेशनशिवाय व्यक्तींना प्रमाणित करण्याचा हा एक त्वरित, सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे.

डिजिटल केवायसी-

या प्रक्रियेत, तुमच्या ओव्हीडी चे जिओटॅगिंग आणि थेट छायाचित्र वापरून केवायसी केले जाते. ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर तुमची केवायसी कागदपत्रे अपलोड करून ही प्रक्रिया पूर्ण होते.

ऑफलाइन केवायसी-

ही पद्धत सामान्यपणे ओळख प्रमाणीकरणासाठी ऑनलाईन पद्धत उपलब्ध नसल्यास किंवा कार्यक्षम नसल्यास वापरली जाते. ऑफलाईन केवायसी व्हेरिफिकेशन पडताळणी ही प्रत्यक्ष कागदपत्रे सारख्या ऑफलाईन पद्धतींचा वापर करून एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची ओळख पडताळण्याची प्रक्रिया आहे. अचूकता आणि वैधता सुनिश्चित करण्यासाठी प्रक्रियेदरम्यान कस्टमरची वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रे संकलित केली जातात आणि पडताळली जातात. संकलित केलेल्या माहितीमध्ये सरकारने जारी केलेला आयडी, युटिलिटी बिल, पासपोर्ट किंवा ओळख सिद्ध करणारे इतर कागदपत्रे समाविष्ट असू शकतात.

$ads={2}

व्हिडिओ केवायसी-

ही रिमोट व्हिडिओ तंत्रज्ञान वापरून ग्राहकांची ओळख प्रमाणित करण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया आहे. ही पेपरलेस प्रक्रिया आहे ज्यामध्ये केवायसी दस्तऐवज सबमिट केल्यानंतर, वित्तीय संस्थेद्वारे प्रदान केलेले ऍप वापरून व्हिडिओ रेकॉर्ड करणे आवश्यक आहे. त्यानंतर, तुमची माहिती वित्तीय संस्थेच्या प्रतिनिधीद्वारे व्यक्तिचलितपणे सत्यापित केली जाते. या प्रकारचे प्रमाणीकरण विशेषत: जगभरातील ग्राहकांसोबतच्या व्यवसायांसाठी उपयुक्त आहे, कारण त्यांना वैयक्तिक बैठकांची आवश्यकता न करता त्वरित आणि सुरक्षितपणे त्यांच्या ग्राहकांच्या ओळखीची पडताळणी करण्याची परवानगी देते. या पद्धतीने, ग्राहक त्यांच्या आयडी कागदपत्रे जसे की पासपोर्ट किंवा चालकाचा परवाना दाखवणार्‍या कॅमेर्‍यावर स्वत:ला रेकॉर्ड करू शकतात आणि नंतर पडताळणीसाठी कंपनीच्या सर्व्हरमध्ये हा व्हिडिओ अपलोड करू शकतात.

सेंट्रल केवायसी-

सेंट्रल केवायसी, ज्याला सीकेवायसी देखील म्हणतात, तुमची वैयक्तिक माहिती सत्यापित करण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देते, त्यानंतर तुमचे केवायसी रेकॉर्ड केंद्रीय भांडारात राखले जातात. सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन सेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया (सीईआरएसएआय) केंद्रीय भांडाराच्या देखरेखीसाठी जबाबदार आहे. एकदा तुमचे तपशील (सीईआरएसएआय) डेटाबेसमध्ये जोडले गेल्यावर, तुम्हाला १४-अंकी क्रमांक दिला जाईल जो तुम्हाला भविष्यात तुमची माहिती ऍक्सेस करण्यास अनुमती देईल.

निष्कर्ष

केवायसी ही एक महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे जी प्रत्येक व्यवहार पारदर्शक आणि सुरक्षित असल्याची खात्री करून बँका आणि त्यांच्या ग्राहकांचे रक्षण करते. ही प्रक्रिया केवळ ग्राहकांची ओळख पडताळण्यातच मदत करत नाही तर मनी लाँड्रिंग, फसवणूक आणि दहशतवादी वित्तपुरवठा यांसारख्या आर्थिक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. केवायसी अनुपालनामुळे बँकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्यास मदत होते, ज्यामुळे मोठा दंड आणि कायदेशीर परिणाम टाळता येतात. कठोर KYC प्रक्रिया राखून, भारतातील बँका त्यांच्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करतात, कारण त्यांच्या वित्तीय संस्था त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहेत हे जाणून ग्राहकांना अधिक सुरक्षित वाटते. हा विश्वास स्थिर आणि मजबूत बँकिंग वातावरण राखण्यासाठी मूलभूत आहे. शिवाय, KYC प्रक्रिया तपशीलवार ग्राहक प्रोफाइल तयार करण्यास सुलभ करतात, ज्याचा वापर बँका त्यांच्या सेवा अधिक प्रभावीपणे तयार करण्यासाठी करू शकतात. त्यांच्या ग्राहकांची आर्थिक वर्तणूक आणि गरजा समजून घेऊन, बँका ग्राहकांचे समाधान आणि निष्ठा वाढवून वैयक्तिक उत्पादने आणि सेवा देऊ शकतात. थोडक्यात, KYC हा भारतातील सुरक्षित, पारदर्शक आणि ग्राहक-केंद्रित बँकिंग इकोसिस्टमचा आधारस्तंभ आहे, जो वित्तीय संस्थांच्या सचोटी आणि विश्वासार्हतेला आधार देतो.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने

{Ads}


इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या

{Ads}

.
amazon वर एकदा चेक तर करा
सर्व आपल्या बजेटमध्येच आहे,
Watches- Men     Women
Footwear- Men      Women
.


.
amazon वर आज कोणत्या ऑफर्स
.