मुन्नाभाईची शिकवण |
शिक्षणाचा उपयोग विशेष करून इंग्रजी बोलण्याचा उपयोग आपण आपले ज्ञान वाढविण्यासाठी करण्यासाठी करणे अपेक्षित असते. मात्र अनेक जण स्वत:ला इंग्रजी बोलण्याचा उपयोग दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी करतात. समोरच्याला इंग्रजी येत नसल्यास त्याचा अपमान करतात, त्याच्यावर असतात. वास्तविक भाषा हे संवाद साधण्याचा साधन आहे. हे समजून घ्यायला हवे. एखाद्याला इंग्रजी येत नसल्यास त्या व्यक्तीला बिनकामाचा आणि टपोरी समजणे अतिशय चुकीचे आहे. इंग्रजी न बोलता येणाऱ्या व्यक्तीने त्याचा अपमान झालेला असतांना सुद्धा दुसऱ्याची मदत कशी केली, हे प्रस्तुत लेखात स्पष्ट केले आहे.
लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटाने आयुष्य बदलले
चार बाईक आणि त्यावर चार कॉलेजकुमार आपल्या छोट्याशा हॉटेलमध्ये आल्यावर हॉटेलमालकाला आश्चर्य वाटले. त्यांच्यातील राहूल नावाच्या तरूण मुलाने गोलू नावाच्या वेटरकडे पहात शो योर मेनूकार्ड? असे म्हटले. गोलूला मेनूकार्ड हा शब्दच माहीत नव्हता. चौथी पासून शिक्षण सोडून हॉटेलमध्ये तो काम करता होता. त्याला इंग्रजीचा गंध नव्हता. राहूलने काय विचारले हे त्याला काहीच उमजले नाही. त्यामुळे त्याने प्रतिप्रश्न केला, साहेब हे मेनूकार्ड काय असते? हे ऐकून चारही जण खिदीखिदी हसले. गोलूला अपमान वाटेल असे हातवारे ते करायला लागले. त्यातील सर्वजण राहूलला अशा फालतू हॉटेल मध्ये आणले म्हणून चिडवू लागले.
सखारामच्या हॉटेलमध्ये फक्त समोसा, कचोरी, पूरी भाजी असेच पदार्थ बनत होते. पोरांना मात्र पिझ्झा, बर्गर असे पदार्थ हवे होते. तसेच गोलूूला इंग्लिश न समजल्यामुळे सुद्धा सर्वांनी त्याची चेष्टा - मस्करी केली. हॉटेलमालक हे सर्व दूरून पहात होता, परंतु तो सुद्धा पुढे आला नाही, कारण त्याची इंग्रजी सुद्धा जेमतेमच होती. फालतू-हॉटेल, बकवास हॉटेल असे काहीतरी म्हणत सर्व कॉलेजकुमार काहीही न खाता बाहेर पडले. राहुल सर्वात पुढे होता. जाता जाता त्यांनी खुर्च्याही जोऱ्यात मागे लोटल्या. हॉटेल मालकाकडे बघून फिदीफिदी हसत ते हॉटेलच्या बाहेर आले.
खरंतर राहूल आज सर्वांना पार्टी देणार म्हणून ते एकत्र आले होते. हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या बाईकला कीक मारत राहूल ने जोऱ्यात बाईक सुरू केली आणि पुढे वेगात निघतांना एक कार अचानक समोर आली, तिला चुकवतांना राहूल रस्त्याच्या बाजूला पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात फेकला गेला, खड्ड्यात पूर्ण चिखल होता, खड्ड्यात पडल्यामुळे तो पूर्णपणे चिखलाने भरला, त्याने मदतीसाठी हात पुढे केला, त्याचे मित्र मात्र फिदी फिदी हसत होते. दोन जण कारचालकाशी भांडत होते, राहुलला मात्र कुणीच हात देण्यासाठी पुढे येत नव्हते. स्वत:ला इंग्रजी बोलता येते म्हणून सुशिक्षित समजाणारे राहूलचे मित्र राहूला मदत करण्यासाठी प्रथम प्राधान्य दाखविण्याऐवजी वेगळ्याच बाबींवर प्राधान्य दाखवित होते.
हॉटेलबाहेर येताच गोलूला परिस्थितीचा अंदाज आला, तो लगेच धावत आला, त्या मोठ्या खड्ड्यात उतरला आणि त्याने राहूलला व्यवस्थित धरून बाहेर काढले, अशा स्थितीत सुद्धा राहूलचे मित्र कपडे खराब होतील म्हणून दूरच उभे होते आणि गोलूला मात्र भरपूर सूचना देत होते. नंतर कार चालकाने राहूलला हॉस्पीटलमध्ये ऍडमीट केले.
घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे राहूलने अतिशय पॉश हॉस्पीटलमध्ये उपचार घेतले, पायाला फ्रॅक्चर निघाल्यामुळे त्याला काही दिवस ऍडमिट व्हावे लागले, स्पेशल रुममध्ये लगे रहो मुन्नाभाई बघतांना राहूलला एका सीन वरून स्वत:च्या वागणूकीवर पश्चाताप झाला. त्या सीनमध्ये संजय दत्त रेडीओवरून एका मुलीला सल्ला देतो की नियोजित वराची निवड करायची असेल तर तो आपल्या खालच्या माणसांशी कसा वागतो, हे तपासावे. नंतर तो नियोजित वर हॉटेलमधील वेटरला शूक शूक करून हाक मारतो आणि ती मुलगी काहीही न सांगता तेथून पळ काढते.
हा सीन बघून राहूलने विचार केला की ज्या मित्रांच्या आणि ज्या इंग्रजी शिक्षणाच्या जोरावर आपण गोलू वेटरचा तेथे अपमान केला ते मित्र अपघात झाल्यावर मदतीला धावले नाही, पण ज्या व्यक्तीला आपण गावढळ म्हणून हिणवले तो मात्र कशाचाही विचार न करता लगेच मदतीला धावला. केवळ गरीब किंवा कमी शिकलेला आहे म्हणून कोणाचाही अपमान करणे योग्य नाही. तसेच मित्र निवडतांना अशा उच्चशिक्षित टारगट मुलांची निवडही चुकीचीच ठरते. लगे रहो मुन्नाभाई चित्रपट संपल्यावर राहूलने मनातच एक ठोस निश्चय केला. या चित्रपटामागील निर्मात्याचा हेतू त्याने ओळखला. भाषा कोतिही असो, देश कोणताही असो आणि शिक्षण काहीही असो, या सर्वांवर चांगूलपणा नेहमीच वरचढ ठरतो. चांगूलपणा दाखविण्यासाठी इंग्रजी येण्याची किंवा उच्च शिक्षणाची गरज नसते.
सदर घटनेमुळे राहुलला बरेच शहाणपणे आले. त्याने गोलुला पुढील शिण घेण्यास राजी केले. राहूलचे घराणे खूप श्रीमंत असल्यामुळे त्याला भरपूर पॉकेटमनी मिळत होता. त्याने आपला पॉकेटमनी थोडासा कमी करून त्यातूनच गोलूला पार्टटाईम शिक्षणाच्या दृष्टीने त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला. तेसच यापुढे मित्रांची निवड करतांना सावधगिरीही बाळगण्याचे ठरविले. टपोरी, छपरी प्रकारे मुलं उच्चशिक्षित असले तरी एक व्यक्ती म्हणून ते बिनकामाचे असतात, हे आता राहूलला आता समजले. तसेच सर्व प्रकारची हुल्लडबाजी आणि टपोरीपणा पूर्णपणे बंद त्याने केला. विशेष म्हणजे राहूल सर्वांशीच आता अदबीने बोलायला शिकला.
अपघाताची घटना आणि चित्रपटातील प्रसंग यामुळे राहुलने आपली जीवनशैली बदलण्याबाबत ठोस असा निश्चय केला. याच निश्चयामुळेे राहुलचे आयुष्य बदलले. आपल्या जीवनात दुसऱ्याशी संवाद साधणे आणि चांगले मित्र निवडणे किती महत्त्वाचे आहे, हे त्याला पटले. तर आपण केव्हा समजूतदार होणार, अपघाताची वाट पाहू नका. आजपासूनच सुरूवात करा.
वरील प्रसंगावरून आपणास असे समजते की निरक्षर व्यक्तींकडे आणि कमी शिकलेल्या व्यक्तींकडे अनुभव, अंतर्ज्ञान आणि साधनसंपत्ती यातून जन्मलेल्या ज्ञान आणि कौशल्यांचा खजिना असतो. प्रतिकूल परिस्थितीत, ते आव्हानात्मक परिस्थितीत हाताळण्यासाठी त्यांच्या अंतःप्रेरणेवर आणि सर्जनशीलतेवर विसंबून, लवचिक समस्या सोडवणारे असल्याचे सिद्ध करतात. चौकटीबाहेरचा विचार करण्याची आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता अतुलनीय आहे. शिवाय, असे व्यक्ती त्यांच्या समुदायाचा कणा असतात, आवश्यक आधार आणि शहाणपण प्रदान करतात. ते कुशल कारागीर, प्रतिभावान संगीतकार किंवा प्रतिभावान कथाकार असू शकतात, जे त्यांच्या सभोवतालच्या लोकांचे जीवन समृद्ध करतात.आपण साक्षरतेच्या पातळीकडे दुर्लक्ष करून, प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या क्षमतेचा उपयोग करू शकतो. एकत्रितपणे, आपण अधिक दयाळू आणि न्याय्य जग तयार करू शकतो जे प्रत्येक व्यक्तीचे मूळ मूल्य आणि प्रतिष्ठा ओळखते.
* (Image source- Image generated by Meta AI)