मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना


राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण अशी ही योजना आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अँनेमियाचे प्रमाणे ५० पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ५९.१० टक्के व स्त्रीयांची टक्केवारी २८.७० टक्के इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. 

महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास शासन निर्णय दि. 28/06/2024 अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा:  

सदर योजनेत आता दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. 01 जुलै 2024 पासून दरमहा 1500/- रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारवर वर्षाला ४६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. 

योजनेचे उद्दिष्ट:

  • आर्थिक सहाय्य: आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना दरमहिना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
  • सशक्तीकरणास चालना: राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.
  • पुनर्वसन: त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
  • आत्मनिर्भर: राज्यातील महिलांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करणे.
  • रोजगार निर्मितीस चालना: राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
  • आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा: महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

योजनेचे स्वरुप:

पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा १,५००/- रुपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र / राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे १,५००/- रुपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.

योजनेचे वैशिष्ट्य:

  • योजनेअंतर्गत दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
  • सर्व जातीतील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  • योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता कागदपत्रे 

  • योजनेच्या लाभासाठी अर्ज.
  • ओळखपत्र: अर्जदार मुलगी / महिलेचे आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)
  • बँक खात्याची माहिती: बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • फोटो: पासपोर्ट आकाराचा फोटो (ऑफलाईन अर्ज करताना)
  • हमीपत्र: सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
  • रहिवास प्रमाणपत्र: 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड/वीज बिल, जन्म दाखला, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (यापैकी एक)
  • उत्पन्न दाखला: पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ची झेरॉक्स

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अटी व शर्ती अटी व शर्ती

  • केवळ महिला लाभार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • जर अर्जदार महिलेचा जन्म महाराष्टाच्या बाहेर झाला असेल परंतु तिने महाराष्ट्र राज्यातील मुलासोबत लग्न केले असेल तर अशा परिस्थितीत तिला आपल्या पतीचे कागदपत्र जोडणे आवश्यक राहील.
  • अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
  • फक्त 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला/मुलींनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
  • अर्जदार महिलेचे वय 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. त्यामुळे जर अर्जदार महिलेचे वय 21 वर्षापेक्षा कमी असेल आणि 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा परिस्थितीत तिचा अर्ज रद्द केला जाईल आणि तिला यो योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार महिलेचे स्वतःच्या नावे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला/मुलगी च्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल. अर्ज करताना खोटी माहिती भरू नये.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील अविवाहित, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
  • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार महिला/मुलगी जवळ पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका / सेतू सुविधा केंद्र / ग्रामपंचायत / ग्रामसेवक / वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका / मुख्यसेविका / सेतू सुविधा केंद्र / ग्रामपंचायत / ग्रामसेवक / वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील. तसेच आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क: या योजनेअंतर्गत ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेकडून कसल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे अर्ज प्रक्रिया निशुल्क आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात

या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात आली आहे, त्यामुळे अर्ज प्रक्रिया जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आवश्यक वयोमर्यादा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आवश्यक वयोमर्यादा: या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय 21 वर्षे ते 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. त्यामुळे 21 वर्षाखालील आणि 65 वर्षावरील महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही

  • ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त आहे.
  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
  • अर्जदार महिला केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणारा एखाद्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ घेत असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/ आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक / सदस्य आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे. (योजनेच्या नवीन सुधारणेनुसार जमिनीची अट रद्द केली गेली आहे)
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त असल्यास
  • अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिलेचे वय 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षपेक्षा जास्त असल्यास
  • तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे स्पष्ट दिसत नसल्यास

लाडकी बहीण योजना कागदपत्रे -

सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत

  • • योजनेच्या लाभासाठी अर्ज.
  • • ओळखपत्र: अर्जदार मुलगी / महिलेचे आधार कार्ड
  • • उत्पन्नाचा दाखला: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)
  • • बँक खात्याची माहिती: बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • • फोटो: पासपोर्ट आकाराचा फोटो (ऑफलाईन अर्ज करताना)
  • • हमीपत्र: सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
  • • रहिवास प्रमाणपत्र: 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड/वीज बिल, जन्म दाखला, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (यापैकी एक)
  • • उत्पन्न दाखला: पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ची झेरॉक्स
  • अर्जासोबत कागदपत्रे अपलोड / जोडताना करताना घ्यावयाची काळजी:
  • • योग्य स्वरूप: अपलोड करायच्या आधी सुनिश्चित करा की तुमची कागदपत्रे आवश्यक स्वरूपात (PDF, JPG) आहेत. अर्ज करण्यापूर्वी सूचना तपासा.
  • • आकार मर्यादा: कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी प्रत्येक कागदपत्राचा आकार मर्यादा तपासा.
  • • स्पष्टता: कागदपत्रे चांगल्या प्रकारे स्कॅन केलेली आणि वाचण्यास सुलभ असल्याची खात्री करा. तुमची कागदपत्रे स्पष्ट दिसत नसल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो
  • • पूर्णपणा: अर्जाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • • सुरक्षा: तुमची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • • दुरुस्थी : कागपत्रात काही दुरुस्थी करायची असेल तर ती आधी बरोबर करून घ्या त्या नंतरच कागदपत्रे अपलोड करा जेणेकरून अर्ज रद्द होणार नाही.
  • अतिरिक्त टिपा:  कागदपत्रांची नावे: कागदपत्रांना अर्थपूर्ण नावे द्या जेणेकरून त्या ओळखणे सोपे होईल. उदाहरणार्थ, “AadharCard.pdf” ऐवजी “Your Name_AadharCard.pdf” वापरा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

अर्जदार ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

• अर्जदाराला सर्वात प्रथम Google Play Store वर जावे लागेल..
• Google Play Store वर जाऊन Application डाउनलोड करून अर्ज भरावा लागेल.
• मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Online Apply: येथे क्लिक करा

मोबाईलवरून कसा कराल अर्ज?

१) सर्वप्रथम गुगल प्ले-स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत’ हे अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे, त्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून लॉगीन करा.
२) ‘Accept Term and Condition’ वर क्लिक करा आणि स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा.
३) ज्या मोबाईल क्रमांकाने तुम्ही लॉगीन केलं, त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये टाकून ‘व्हेरिफाय ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करा.
४) त्यानंतर ‘तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा’ असा संदेश येईल. तिथे ‘आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा’, या पर्यायावर क्लिक करा.
५) प्रोफाईल अपडेट करताना, तुमचं पूर्ण नाव, ईमेल आयडी (पर्यायी), जिल्हा, तालुका, नारीशक्तीचा प्रकार अपडेट करा.
६) प्रोफाईल अपडेट केल्यानंतर खाली ‘नारीशक्ती दूत’ या पर्यायावर क्लिक करा.
७) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या पर्यायावर क्लिक करा.
८) महिलेचे संपू्र्ण नाव (आधार कार्डप्रमाणे), पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्म तारीख, जन्माचे ठिकाण (गाव/ शहर) पीन कोड, पूर्ण पत्ता, अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहे का?, वैवाहिक स्थिती आणि बॅंक खात्याच तपशील भरा.
९) संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखल/रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, (डाऊनलोड करून प्रिंट काढून त्यावर सही करा आणि पुन्हा अपलोड करा) आणि बॅंकेच्या पासबूकच्या फोटो आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा, आणि खाली ‘जतन करा’. या पर्यायावर क्लिक करा.
१०) तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे की नाही, तपासून घ्या आणि ‘अर्ज दाखल करा’, यापर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी भरून अर्ज दाखल करा.
१२) केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:

अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध करण्यात येईल.व भरलेला अर्ज नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म-येथे क्लिक करा, येथे क्लिक करा

महत्वाच्या बाबी:

• या योजनेच्या अटी व शर्ती मध्ये बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही शासनाच्या अधिकृत पोर्टल वर भेट देणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कार्यपद्धती

अर्ज करण्याची प्रक्रिया: योजनेचे अर्ज पोर्टल / मोबाइल अॅपद्वारे / सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे

  • पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
  • ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी “अर्ज” भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात / बाल प्रकल्प अधिकारी कार्यालये विकास (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
  • वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) / सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
  • अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
  • अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र ( रेशनकार्ड)
  • स्वतःचे आधार कार्ड

तात्पुरत्या यादीचे प्रकाशन:

अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल/अॅपवर जाहीर केली जाईल, त्याची प्रत अंगणवाडी केंद्र / ग्रामपंचायत / वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल.

आक्षेपांची पावती:

  • जाहीर यादीवरील हरकत पोर्टल / ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील. याशिवाय अंगणवाडी सेविका / मुख्यसेविका / सेतू सुविधा केंद्र यांचेमार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत / तक्रार नोंदवता येईल. लेखी (ऑफलाईन) प्राप्त झालेल्या हरकत / तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील. पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून ०५ दिवसांपर्यंत सर्व हरकत / तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.
  • सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल.

अंतिम यादीचे प्रकाशन:

  • सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन, पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल. सदर पात्र / अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र/ग्रामपंचायत/ वॉर्ड स्तरावर / सेतू सुविधा केंद्र, तसेच पोर्टल/अॅपवर देखील जाहीर केली जाईल.
  • पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल.
  • लाभाच्या रक्कमेचे वितरण:
  • प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल.
  • योजनेची प्रसिध्दी:
  • सदर योजनेची प्रसिध्दी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद / नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी. तसेच, गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा / महिला सभांमध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.
  • सदर योजनेसाठी वेब पोर्टल व मोबाईल अॅपलिकेशन तयार करण्याची जबाबादारी आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांची राहील.
  • या योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरुळीत कार्यान्वित राहण्याकरीता तसेच पोर्टलचे संचालन, अर्ज Digitized पध्दतीने जतन करणे, पोर्टल वेळोवेळी अद्ययावत करणे याकरीता आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या स्तरावर कक्ष निर्माण करण्यास व त्यामध्ये विहीत पध्दतीने १० तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल. तसेच योजना सुरुळीत कार्यान्वित राहण्याकरीता, नियंत्रण ठेवण्यासाठी शासनस्तरावर कक्ष निर्माण करुन ०५ तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल.
  • सदर योजनेचे संनियत्रंण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात येत असून सदर समितीची रचना खालीलप्रमाणे आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय यावरुन बराच गोंधळ उडाला होता. आता कुठे याबाबत स्पष्टता आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, याचे वेध लागले आहेत. या योजनेबाबत अजूनही आपल्या मनात काही प्रश्न असल्यास खालील लिंक आपण पडताळू शकता. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना GR PDF Click Here
सुधारित शासन निर्णय Click Here

लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमकं काय आहे?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेला एक हमीपत्र द्यायचे आहे.  हे हमीपत्र म्हणजे एका प्रकारचे स्वयंघोषणापत्र आहे. याच हमीपत्रावर सही करताना ते काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. सर्व अटी समजून घेऊनच त्यावर सही करणे गरजेचे आहे. हमीपत्रावर नमूद केलेल्या तिसऱ्या अटीकडे विशेष रुपाने लक्ष देण्याची गरज आहे. 

 या हमीपत्रावर तुम्हाला एकूण आठ स्वयंघोषणा करायच्या आहेत. हमीपत्रावर प्रत्येक घोषणेची (अट) सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. महिलांनी या स्वयंघोषणा व्यवस्थित वाचून सही करायची आहे. 

तिसऱ्या स्वयंघोषणेचा नेमका अर्थ काय?

यामध्ये अर्जदार महिलेच्या कुंटुंबातील सदस्य सरकारी नोकरदार, सरकारी खात्यात कंत्राटी, करार पद्धतीने काम करत नाहीये, याची सरकारला हमी द्यावी लागणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभागात, मंडळात नोकरीवर असेल तर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. 

तिसऱ्या स्वयंघोषणेत नेमकं काय आहे? 

"मी स्वत: किंवा माझ्या कटुंबातील सदस्य नियमीत/ कायम/ कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत," असे हमीपत्राच्या तिसऱ्या स्वयंघोषणेत लिहिलेले आहे. त्यामुळे एखाद्या महिलेच्या कुटंबात एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर त्या महिलेला माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेबाबत अपडेट

1) अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने (Maharashtra Government) या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 15 जुलै ऐवजी 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. एक ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल.

2) या आधी या योजनेसाठी 60 वर्ष वयोगटापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती. परंतु, आता ही अट काढून टाकण्यात आली असून, ही मर्यादा आता 65 वर्ष करण्यात आली आहे. याशिवाय जमिनीच्या मालकीचीदेखील अट काढण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिन्याला महिलांना १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. यासाठी पहिले महिलांना 21 ते 60 वयोगटाची मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र, आता यात वयाच्या अट वाढवण्यात आली असून, 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. शिवाय जमिनीबाबतची अटही काढूण टाकण्यात आली आहे. ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून, पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जातील. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. दरम्यान, लाभार्थी 21 ते 60 वय असलेली महिला असेल. तसंच, त्यांचं वर्षाला उत्पन्न 2,50,500 पेक्षा कमी असावं अशी आहे.

अपडेट

आधी

नवीन अपडेट

वयाची अट

21 ते 60 वर्ष

21 ते 65 वर्ष

अविवाहित
मुली

अविवाहित मुलीला लाभ नाही.

कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला लाभ दिला जाईल

जमीन

5 एकर पेक्षा जास्त शेत जमिनीची अट होती

जमिनीची अट रद्द केली गेली आहे

रहिवास
प्रमाणपत्र

डोमसाईल दाखला आवश्यक

15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड/वीज बिल, जन्म दाखला, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (यापैकी एक)

उत्पन्न
दाखला

तहसीलदार यांनी दिलेला दाखला अनिवार्य

पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील चालेल.

अर्ज करण्याची
शेवटची तारीख

15 जुलै 2024

31 ऑगस्ट 2024

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने

{Ads}


इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या

{Ads}

.
amazon वर एकदा चेक तर करा
सर्व आपल्या बजेटमध्येच आहे,
Watches- Men     Women
Footwear- Men      Women
.


.
amazon वर आज कोणत्या ऑफर्स
.