नॅनो शॉपिंग-एक नवीन तंत्र

Nano Shopping-A New Technique
कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आनंद देण्यासाठी नॅनो शॉपींग-

काही वर्षांपूर्वी टाटा कंपनीने नॅनो कार बाजारात आणून भारतात नॅनो या शब्दाला जबरदस्त प्रसिद्धी मिळवून दिली. या कारमुळे नॅनो हा शब्द सर्व जनतेच्या मुखात पोहोचला हे खरे असले तरी नॅनो हा नवीन मात्र नक्की नाही. विज्ञानात हा शब्द खासकरून भौतिक शास्त्र, जीव शास्त्र आणि रसायन शास्त्रामध्ये नेहमी वापरला जातो. मग नॅनो तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय?

कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आनंद देण्यासाठी नॅनो शॉपींग 

खरं तर एखाद्या वस्तूच्या सूक्ष्म अणूबद्दल माहिती मिळवण्यासाठी व त्यांचेवर नियंत्रण मिळवून त्यांच्या आतापर्यंत माहीत नसलेल्या गुणधर्मांचा उपयोग करून नवनवीन उपयुक्त वस्तू तयार करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे नॅनो टेक्नॉलजी होय. नवनवीन पदार्थांची निर्मीती करण्याची क्षमता असलेले हे शास्त्र वैद्यक, औषधनिर्मीती, इलेक्ट्रॉनिक्स तसेच ऊर्जानिर्मीतीसाठी उपयुक्त ठरत आहे. पण आपल्याला आता या तंत्राच्या खोलात अजिबात जायचे नाही, कारण आपल्याला नॅनो शॉपिंग समजून घ्यायचे आहे. या आधुनिक युगात आता सर्व क्षेत्रात नॅनो तंत्र अवतरले आहे त्या सोबत नॅनो हे बऱ्याच कर्मांना क्रियाविशेषण म्हणून उपयोगात येऊ लागल्याने काही नवीन शब्दांचा जन्म झाला आहे, त्यातूनच नॅनो शॉपिंग हा शब्द उदयास आला. विशेष म्हणजे नॅनो शॉपिंगची पद्धत अनेक शहरांमध्ये पोहचली असून अनेक कुटूंबांनी ती अतिशय होकारात्मक दृष्टीने स्विकारली आहे.

सध्याच्या युगाला स्पर्धेचे युग तर काहीजण डिजीटल युग तर काही जण इलेक्ट्रॉनिक युग म्हणून संबोधतात. पण सर्वच क्षेत्रात वाढलेल्या महागाईमुळे सामान्य लोक याला महागाईचे युग म्हणूनच संबोधत असतात. म्हणून बायकोसोबत शॉपिंगला जाणे पुरूषांसाठी कायमच डोकेदुखीचा विषय ठरत आलाय. बायकोसोबत शॉपिंगला गेलं की एकेका दुकानात पाहिले जाणारे विविध प्रॉडक्ट, पॅटर्न, दुकानदाराशी केलेली घासाघीस, अनावश्यक वस्तुंची केलेली खरेदी, पाकिटाला न झेपणारी कपड्यांची खरेदी या सर्व प्रकारांचा सामना करतांना प्रचंड मनस्ताप होतो. पुरूष आणि महिलांच्या शॉपिंगच्या विषयावर संशोधन करून धुळे येथील श्री योगेश भोलाणे यांनी यावर पर्याय म्हणून नॅनो शॉपिंग ही कला विकसित केली आहे. बऱ्याच कुटूंबांनी नॅनो शॉपिंग आत्मसात करून शॉपिंग हा एक आल्हाददायक अनुभव बनविला आहे. अर्थातच नॅनो शॉपिंगसाठी पती आणि पत्नी या दोघांचा समजुतदारपणा आणि मंजुरी आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नॅनो शॉपींग म्हणजे कंजुसपणा अजिबात नाही किंवा शॉपींग टाळणे तर नाहीच नाही. नॅनो शॉपींग या कन्सेप्टमध्ये अपेक्षित वस्तू तर घ्यायची आहे, घरातील प्रत्येकाची गरजही पूर्ण करायची आहे, एकूण बजेटची भानही ठेवायचे आहे. तसेच ही शॉपींग करतांना आपणास कुणापुढे हातही पसरण्याची गरज नाही आणि कर्ज काढायची गरज नाही. मग नॅनो शॉपींग नेमकी असते तरी कशी?

नॅनो शॉपिंग कशी करायची? 

नॅनो शॉपिंग पद्धतीत खरेदी तर करायची असतेच, पण ती अगदी किमान स्तरावर. म्हणजे घरात लागणाऱ्या सर्वच वस्तुंची प्रत्येकवेळी खरेदी करायची पण आवश्यक तेवढीच. उदाहरणार्थ जर मर्यादित खर्चात दसरा-दिवाळीसाजरी करावयाची असल्यास केवळ सोने खरेदीवर सर्व पैसा खर्च करायचा आणि कपडे घेण्याचे टाळायचे असे करण्यापेक्षा सर्वच प्रकारच्या खरेदीची किमान आवश्यकता डोळ्यासमोर ठेऊन खरेदीचे बजेट बनवायचे आणि त्याप्रमाणे खरेदी करायची. जसे पाच ग्रॅम सोने घेण्याऐवजी सोने एक ग्रॅम खरेदी करून उरलेला पैसा घरातील प्रत्येक सदस्याला किमान एक ड्रेस घेण्यासाठी वापरावा. वॉशिंग मशिन आणि एलसीडी टि.व्ही. अशा दोन्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तु घेण्याची ईच्छा असतांना बजेट अभावी केवळ एक वस्तु खरेदी करून आयुष्य काढण्यापेक्षा एलसीडी टिव्ही २१ इंची ऐवजी १४ इंची आणि वॉशिंगमशिन १६ लिटर ऐवजी ७.५ लिटरचे खरेदी करून दोन्ही वस्तु घरात असल्याचा सुखद अनुभव घ्यायचा. तसेच एकच मोबाईल घरातील एकाने ८०,००० ते एक लाख रूपयांचा घेण्याऐवजी १५ ते २० हजाराचे चार मोबाईल घरातील प्रत्येकासाठी घ्यायचे. भाजीपाला बाजारात सुद्धा नॅनो शॉपिंग तंत्र वापरता येउ शकते. जसे ९० रूपये किलोचे एक किलो सफरचंद घेण्यापेक्षा २०रू. किलोचे पेरू आणि उर्वरित पैशांमध्ये चार दिवस पुरेल एवढा भाजीपाला आणता येतो. म्हणजेच एकूण बजेट विचारात घेऊन किमान आवश्यक खरेदीचे सर्वच बाबींवर केलेले उत्तम प्रकारचे सूक्ष्म नियोजन म्हणजे नॅनो शॉपिंग अशी व्याख्या करता येईल.

कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे समाधान करण्यासाठी शहाणपणाने खरेदी करणे हे एक आव्हानात्मक काम असू शकते, परंतु ते साध्य करण्यात मदत करण्यासाठी येथे काही टिपा आहेत:
  • खरेदीचा प्लॅन तयार करा: तुम्ही खरेदीला जाण्यापूर्वी, तुम्हाला खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची यादी तयार करा आणि महत्त्व आणि निकड लक्षात घेऊन त्यांना प्राधान्य द्या.
  • कुटुंबातील सदस्यांना सामील करा: कुटुंबातील प्रत्येक सदस्याला खरेदी सूचीमध्ये योगदान देण्यास सांगा किंवा त्यांची प्राधान्ये आणि गरजा सांगा. त्या सदस्याला काय हवे किंवा त्याच्या मागण्या जास्त असल्यास त्यातील मागण्यांचा प्राधान्य क्रम तयार करा.
  • बजेट तयार करा: तुम्ही किती खर्च करू शकता ते ठरवा आणि त्यावर चिकटून रहा. म्हणजे कुणाच्या कितीही डिमांड असल्या किंवा आग्रह असला तरी ठरलेल्या बजेटच्या रकमेच्या वर खरदी करायची नाही, हे अगोदरच प्रत्येक सदस्याला बजावून सांगा.
  • अष्टपैलू वस्तू निवडा: कुटुंबातील अनेक सदस्य वापरू शकतील किंवा अनेक उद्देशांसाठी वापरता येतील अशा उत्पादनांची निवड करा. जेणेकरून घरातील एका सदस्याने त्याच्यासाठी घेतलेली वस्तू इतर सदस्यही वापरू शकतील आणि ती वस्तू सर्वांच्या उपयोगी पडल्याने प्रत्येकाची गरज पूर्ण होईल.
  • विक्री आणि सवलतींचा विचार करा: तुमचे बजेट वाढवण्यासाठी सूट, कूपन आणि जाहिरातींचा लाभ घ्या. म्हणजे तुम्ही ठरवता त्या दिवशी खरेदी करण्याऐवजी त्या त्या दुकानात जेव्हा सेल लागू होतो त्या दिवशी खरेदी करा. हे करण्यासाठी स्वत:ला अपडेटेड ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या सेलचा किंवा डिस्काऊंट ऑफरचा नक्की फायदा घेता येईल. याशिवाय ऑफ-पीक अवर्समध्ये खरेदी करा.पॉइंट किंवा पैसे परत मिळवण्यासाठी कॅशबॅक ऍप्स आणि रिवॉर्ड प्रोग्राम वापरा.
  • स्मार्ट खरेदी करा: खरेदी करण्यापूर्वी किंमती, गुणवत्ता आणि वैशिष्ट्‌यांची तुलना करा. एखादी हलक्या दर्जाची वस्तू केवळ स्वस्त म्हणून खरेदी करू नका.
  • सेकंड-हँड पर्यायांचा विचार करा: कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील अशा वापरलेल्या वस्तू किंवा सेकंड हॅण्ड वस्तू आपण खरेदी करू शकतात. म्हणजे तुम्हाला कार घ्यायची ईच्छा आहे आणि नवीन कार घेण्याइतपत तुमचे बजेट नाही आणि भविष्यातही तेव्हढे बजेट शक्य नाही. या स्थितीत तुम्ही सेकंड-हॅण्ड कारचा पर्याय निवडू शकतात. सेकंड हॅण्ड कार एका हुशार माणसाच्या सल्ल्याने विकत घेतल्यास उपयोगी ठरू शकते.

लक्षात घ्या की नॅनो शॉपींग तंत्र अमलात आणण्यासाठी छोट्या आणि मोठ्या मुलांना खरेदी प्रक्रियेत सामील करून घ्या. त्यांना बजेटिंग आणि जबाबदार खर्चाविषयी जाणीव करून द्या. खरेदी बाबत लवचिक धोरणाचे महत्तव समजावू सांगा. खरेदी हा प्रत्येकासाठी आनंददायी अनुभव बनवा. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये राहून सुज्ञपणे खरेदी करू शकता आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला संतुष्ट करू शकता. अनेक कुटूंब या नॅनो शॉपिंगमुळे समाधानी झालेत, आपण केव्हा हे नॅनो शॉपिंग तंत्र आत्मसात करणार?

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने

{Ads}


इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या

{Ads}

.
amazon वर एकदा चेक तर करा
सर्व आपल्या बजेटमध्येच आहे,
Watches- Men     Women
Footwear- Men      Women
.


.
amazon वर आज कोणत्या ऑफर्स
.