आईच्या नावाने एक झाड-मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन

One tree in the name of mother
A tree in the name of mother

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर, भाजपच्या नेतृत्वाखालील नवीन एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर यांनी प्रथमच ३० जून, २०२४ रोजी मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पर्यावरण आणि वृक्षारोपणाच्या संदर्भानं देखील पंतप्रधानांनी माहिती दिली.

एक पेड मॉं के नाम - मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन 

लोकसभा निवडणुकींच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला नव्हता. पंतप्रधान मोदींनी तब्बल चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच मन की बात रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेशी संवाद साधत असतात. या कार्यक्रमाचा हा १११ वा भाग होता. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये त्यांनी ‘मन की बात’ हा कार्यक्रमाद्वारे संवाद साधला होता. कार्यक्रमाचा ११० वा भाग होता.

३० जूनचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपले आदिवासी बांधव हा दिवस ’हुल दिवस’ म्हणून साजरा करतात. हा दिवस परकीय राज्यकर्त्यांच्या अत्याचारांना कडाडून विरोध करणार्‍या शूर सिद्धो-कान्हूंच्या अद्भूत धैर्याशी संबंधित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शूर सिद्धो-कान्हू यांनी हजारो संथाली कॉम्रेड्सना एकत्र करुन इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. १८५५ मध्ये हे घडले होते. म्हणजे १८५७ मध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या दोन वर्षे आधी. तेव्हा झारखंडच्या संथाल परगणा येथील आपल्या आदिवासी बांधवांनी परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध शस्त्रे उचलली होती असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

या कार्यक्रमात मोदी यांनी त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. आई आणि मुलांचं नातं हे जगातील सर्वात मौल्यावान नाते आहे. आपल्या सर्वांच्या जीवनात ‘आई’ला सर्वोच्च स्थान आहे. प्रत्येक दुःख सहन करत आई आपल्या मुलाचे संगोपन करते. प्रत्येक आई आपल्या मुलावर प्रेम करते. आपल्या जन्मदात्या आईचे हे प्रेम म्हणजे आपण कधीही न फेडू शकणारे ऋण आहे. आपण आपल्या आईसाठी काही देऊ शकत नाही. पण काहीतरी वेगळं करू शकतो का? याच विचारातून यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेचे नाव आहे - ’एक पेड मॉं के नाम’ असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून केलं. मी देखील माझ्या आईच्या नावाने एक झाड लावले आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आईला सर्वोच्च स्थान आहे. मातृभूमीचीही काळजी घ्या. तीही आपली आईसारखी काळजी घेते, असे मोदी यांनी नमूद केले. लोकं त्यांच्या आईसोबत किंवा तिच्या फोटोसोबत झाडे लावतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. प्रत्येकजण आपल्या आईसाठी झाडे लावत आहे - मग ती श्रीमंत असो वा गरीब, मग ती नोकरदार महिला असो वा गृहिणी. या मोहिमेमुळे प्रत्येकाला आपल्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याची समान संधी मिळाली आहे. या मोहिमेचा अजून एक फायदा होईल. पृथ्वी देखील आईसारखीच आपली काळजी घेत असते. धरणी माता ही आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा आधार आहे आणि म्हणूनच पृथ्वीची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. मॉं के नाम पेड़ या मोहिमेमुळे आपल्या आईचा सन्मान तर होईलच त्यासोबतच धरणी मातेचे रक्षण देखील होईल. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारतात गेल्या एका दशकात वनक्षेत्रात अभूतपूर्व विस्तार झाला आहे. अमृत महोत्सवादरम्यान, देशभरात ६० हजाराहून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती देखील झाली आहे. आता आपल्याला मॉं के नाम पर पेड़ या मोहिमेला अशीच गती द्यायची आहे.

अराकू कॉफी

भारतातील अशी अनेक उत्पादने आहेत ज्यांना जगभरात मोठी मागणी आहे. भारताचे कोणतेही स्थानिक उत्पादन जागतिक पातळीवर जाताना पाहतो तेव्हा त्याचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. असेच एक उत्पादन म्हणजे आंध्र प्रदेशातील अराकू कॉफी. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीता रामा राजू जिल्ह्यात या कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सुमारे दीड लाख आदिवासी कुटुंबे याच्या लागवडीत गुंतलेली आहेत.

केरळमधील कार्थुम्बी छत्र्या

देशाच्या विविध भागात मान्सून वेगाने दाखल होत आहे आणि पावसाळ्यात प्रत्येकजण आपापल्या घरात एक गोष्ट नक्कीच शोधतात ती म्हणजे छत्री. विशेष प्रकारच्या छत्र्या आपल्या केरळमध्ये तयार केल्या जातात. वास्तविक, केरळच्या संस्कृतीत छत्र्यांचे विशेष महत्त्व आहे. छत्र्या हा तिथल्या अनेक परंपरा आणि धार्मिक विधींचा महत्वपूर्ण भाग आहे. पण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी‘कार्थुम्बी छत्र्या’ चा उल्लेख केला. या छत्र्या केरळमधील अट्टापडी येथे तयार केल्या जातात. या रंगीबेरंगी छत्र्या खूपच सुंदर दिसतात आणि विशेष म्हणजे आपल्या केरळच्या आदिवासी भगिनी या छत्र्या तयार करतात. आज देशभरात या छत्र्यांची मागणी वाढत आहे. त्यांची ऑनलाइन विक्रीही केली जात आहे. या छत्र्या ’वट्टलक्की सहकारी कृषी संस्थे’च्या देखरेखीखाली बनवल्या जात आहेत. या सोसायटीचे कामकाज आपल्या देशाची नारीशक्ती पाहत आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली अट्टापडी येथील आदिवासी समाजाने उद्योजकतेचे अप्रतिम उदाहरण सर्वांसमोर प्रस्थापित केले आहे. या सोसायटीने बांबू-हस्तकला युनिटही स्थापन केला आहे. रिटेल आउटलेट आणि पारंपरिक कॅफे उघडण्याच्या दिशेने आता या लोकांची वाटचाल सुरु आहे. केवळ आपल्या छत्र्या आणि इतर उत्पादनांची विक्री करणे हा त्यांचा उद्देश नसून ते जगाला त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देत आहेत. आज कार्थुम्बीच्या छत्र्यांनी केरळमधील एका छोट्या गावातून बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. लोकलसाठी वोकल होण्याचे यापेक्षा चांगले उदाहरण काय असू शकते?

कुवेत सरकारचा हिंदी भाषेत विशेष कार्यक्रम

मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेत सरकारने त्यांच्या राष्ट्रीय रेडिओवर हिंदी भाषेत सुरू झालेल्या विशेष कार्यक्रमाचा उल्लेख केला. दर रविवारी ‘कुवैत रेडिओ’वर हा कार्यक्रम अर्धा तास प्रसारित केला जातो. त्यात भारतीय संस्कृतीच्या विविध रंगांचा आणि पैलुंचा समावेश आहे. आपले चित्रपट आणि कलाविश्वाशी संबंधित चर्चा तिथल्या भारतीय समुदायात खूप लोकप्रिय आहेत. कुवेतचे स्थानिक लोकही यात खूप रस घेत आहेत. हा अद्भुत उपक्रम सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेत सरकार आणि जनतेचे मनापासून आभार मानले.

तुर्कमेनिस्तानमध्ये रवींद्रनाथजी टागोर यांचाही पुतळा

आज जगभरात ज्या प्रकारे आपल्या संस्कृतीचा गौरव होतो आहे, ते पाहून कोणत्या भारतीयाला त्याचा आनंद होणार नाही? आता उदाहरणच सांगायचे तर, तुर्कमेनिस्तानमध्ये, या वर्षी मे महिन्यात, तेथील राष्ट्रीय कवीची ३०० वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींनी जगभरातील २४ प्रसिद्ध कवींच्या पुतळ्यांचे अनावरण केले. यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथजी टागोर यांचाही पुतळा आहे. हा गुरुदेवांचा सन्मान आहे, भारताचाही सन्मान आहे.

सुरीनाममध्ये ५ जून भारतीय समुदाय आगमन दिवस आणि प्रवासी दिवस

तसेच जून महिन्यात दोन कॅरिबियन देशांनी, सुरीनाम आणि सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाइन्स ह्यांनी आपल्या भारतीय वारसा संपूर्ण उत्साहाने जोशात साजरा केला.सुरीनाममध्ये दरवर्षी ५ जून हा दिवस भारतीय समुदाय आगमन दिवस आणि प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. इथे तर हिंदीसोबतच भोजपुरी देखील मोठ्या प्रमाणात बोलली जाते. सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाइन्समध्ये राहणार्‍या भारतीय वंशाच्या आपल्या बंधू भगिनींची संख्या सुमारे सहा हजार आहे. या सर्वांना आपल्या वारशाचा खूप अभिमान आहे. १ जूनला ह्या सगळ्यांनी आपला भारतीय समुदाय आगमन दिन ज्या उत्साहाने साजरा केला त्यात त्यांची ही भावना स्पष्टपणे दिसत होती. जगभरात झालेला भारतीय वारसा आणि संस्कृतीचा असा विस्तार पाहिल्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो.

२०२४ ची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात रेडिओ कार्यक्रमात देशवासियांना संबोधित करताना लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. आज मी देशवासियांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या संविधानावर आणि देशातील लोकशाही प्रणालींवर आपला अतूट विश्वास व्यक्त केला आहे. २०२४ ची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झालेली नाही. या निवडणुकीत देशातील ६५ कोटी लोकांनी मतदान केले आहे. यासाठी मी निवडणूक आयोगाचे आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन करतो असृेंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी टोकियो ऑलिम्पिकबद्दल चर्चा केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आमच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिकपासून आमचे खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त होते. तसेच पंतप्रधान मोदींनी जून महिन्यात संपूर्ण जगाने १० वा योग दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केल्याचा उल्लेख केला. श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित योग कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होते. काश्मीरमध्ये तरूणांसोबत माता-भगिनींनीदेखील योग दिनात उत्साहाने सहभाग घेतला. जसजसा योग दिन साजरा होत आहे, तसतसे नवनवीन विक्रम होत आहेत. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने

{Ads}


इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या

{Ads}

.
amazon वर एकदा चेक तर करा
सर्व आपल्या बजेटमध्येच आहे,
Watches- Men     Women
Footwear- Men      Women
.


.
amazon वर आज कोणत्या ऑफर्स
.