झिका विषाणूचा महाराष्ट्रात प्रसार

Zika-virus-in-Maharashtra
झिका विषाणूचा महाराष्ट्रात प्रसार

महाराष्ट— राज्यात अलीकडेच झिका विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. झिका विषाणू, एक डास-जनित राेग, गंभीर जन्म दाेष आणि न्यूराेलाॅजिकल विकारांशी जाेडला गेला आहे, ज्यामुळे त्याचा प्रसार सार्वजनिक आराेग्यासाठी चिंतेचा बनला आहे. या लेखात, महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती, विषाणूचा झपाट्याने प्रसार हाेण्यास कारणीभूत ठरणारे घटक, सर्वाधिक प्रभावित लाेकसंख्या आणि त्याचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययाेजना. याबाबत माहिती दिली आहे. शिवाय, झिका विषाणूच्या संसर्गाशी संबंधित लक्षणे आणि उपचार, सामान्य लाेकांमध्ये जागरूकता आणि सतर्कता, व्हायरसचा प्रसार राेखण्यासाठी आणि लाेकसंख्येवर हाेणारा परिणाम कमी करण्यासाठी आराेग्य सेवा कर्मचारी, संशाेधक आणि स्थानिक अधिकारी यांच्या प्रयत्नांवरही प्रकाश टाकला आहे. परिस्थिती जसजशी उघड हाेत आहे, तसतसे महाराष्ट्रातील झिका विषाणूचा पुढील प्रसार राेखण्यासाठी माहिती राहणे आणि सक्रिय पावले उचलणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील झिकाचे रुग्ण वाढले

डासांमार्फत पसरणार्‍या झिका या विषाणुजन्य आजाराची सध्या सर्वसामान्यांमध्ये भीती आहे. महाराष्ट्रात जून आणि जुलै २०२४ महिन्यात नुकतीच झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यानंतर आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे.

झिकाचा प्रसार कसा होतो?

झिका हा डेंग्यू आणि चिकुन गुनिया सारखा एडिस डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांसाठी कारणीभूत असलेला संक्रमित एडीज डास चावल्याने हा रोग होतो. हा डास दिवसा चावतो. या आजाराचा प्रसार लैंगिक संपर्काद्वारे, गर्भधारणेदरम्यान आईपासून गर्भापर्यंत संक्रमित होतो, रक्त आणि रक्त उत्पादनांचे रक्त संक्रमण, अवयव प्रत्यारोपणाद्वारे होतो. हा आजार विशेष घातक नसला तरी झिका प्रभावित गर्भवती महिलांमध्ये जन्मलेल्या बाळांच्या मायक्रोसेफली (मेंदूचा आकार लहान असणे) या स्थितीशी संबंधित आहे.

झिकाची लक्षणे

झिकाच्या संसर्ग झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात, त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे,सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरुपाची असतात आणि ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात. या रुग्णांना रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नसून रुग्णांच्या मृत्युचे प्रमाणही नगण्य असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणेे आहे.

गर्भवतींना जास्त धोका का?

झिका विषाणूच्या संसर्गामुळे गर्भावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ामुळे मूल जन्मजात विकृतीसह जन्माला येऊ शकते. हा संसर्ग मुदतपूर्व जन्म आणि इतर गुंतागुंतीसाठी कारणीभूत ठरतो. म्हणून गर्भवतींना या रोगाची लागण झाल्यास बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हा आजार झालेल्या महिलांच्या बाळांच्या डोक्याचा आकार लहान असण्याची शक्यता असते. या आजाराची लक्षणे अनेकदा दिसतच नाहीत, त्यामुळे हा आजार झाल्याचे लक्षातच येत नाही. तर काहीजणांमध्ये लागण झाल्यावर ३-१४ दिवसांनी याची लक्षणे दिसू लागतात. गर्भधारणेदरम्यान झिका विषाणूच्या संसर्गामुळे शिशु मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृतीसह जन्माला येऊ शकते, ज्यास जन्मजात झिका सिंड्रोम म्हणतात. हा एक दुर्मीळ मेंदुविकार असून, त्यात शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा मज्जासंस्थेच्या भागावर हल्ला करते. या विषाणूचा संसर्ग गर्भावस्थाचा मुदतीपूर्वी जन्म आणि गर्भपात यासह इतर गुंतागुंतंशी संबंधित आहे. प्रौढ आणि मुलांमध्ये झीका विषाणूच्या संसर्गाशी संबंधित न्यूरोलॉजिकल गुंतागुंत होण्याची जोखीम आहे. ज्यात मायक्रोसिफॅली (डोक्याचा घेर कमी असणे) गिलाइनबॅरी सिंड्रोमए न्यूरोपैथी आणि मायलायटिसचा समावेश आहे. तसेच, झिकाचा संसर्ग झालेल्या महिलांना आठ आठवडे गर्भधारणा टाळण्यास सांगितले जाते. कारण हा विषाणू रुग्णाच्या रक्तात आठवडाभर राहतो तर वीर्य आणि मूत्रात तो दीर्घकाळ राहतो. तसेच, गर्भवतींच्या रक्तात तो आणखी दीर्घकाळ राहू शकतो.

झिका आजाराचे निदान

राष्ट्रीय रोग निदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था, पुणे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी) तसेच व्हीआरडीएल प्रयोगशाळा, नागपूर, मिरज, सोलापूर, अकोला व छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र , दिल्ली आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च च्या निवडक विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांमध्ये येथे झिका या आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.

झिका आजारावर उपचार

अनेक वेळा संसर्ग झाल्यानंतर सात दिवसांच्या आता रुग्ण आपोआप बरा होतो. याचबरोबर या रोगाचा मृत्युदरही अगदी नगण्य आहे. केवळ गर्भवतींच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाच्या लक्षणांनुसार डॉक्टरांना उपचार करावे लागतात. संसर्ग झालेल्या रुग्णांना अधिकाधिक विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. याचबरोबर शरीरातील निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ घेण्यास सांगितले जाते. रुग्णाला ताप असल्यास त्याला पॅरासिटामॉल औषधे दिली जातात. ऑस्पिरीन अथवा एन.एस.ए.आय.डी. प्रकारातील औषधांचा वापर करु नये. तसेच, या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाणही नगण्य आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या पाच रुग्णांपैकी एक आजारी पडतो आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण त्याहूनही कमी आहे. रुग्णाच्या रक्तनमुना चाचणीतून झिकाचे निदान केले जाते. याचबरोबर लक्षणे दिसून आलेल्या रुग्णाच्या मूत्र तपासणीतूनही रोगाचे निदान होते.

गर्भवतींसाठी विशेष सूचना

राज्यांना गरोदर मातांची झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी करून सतत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. झिका विषाणू संसर्ग झालेल्या गरोदर महिलांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे आदेश असून, राज्यांनी बाधित भागातील आरोग्य सुविधा केंद्रांना झिका विषाणू संसर्गासाठी गरोदर महिलांची तपासणी करण्याचे आणि विषाणू संसर्ग झालेल्या मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.

महाराष्ट्रातील रूग्णांची आकडेवारी-

झिका विषाणु हा फलॅव्हीव्हायरस प्रजातीचा असुन तो एडिस डासांमार्फत पसरतो. भारतात २०१६ मध्ये गुजरात राज्यात प्रथम झिका विषाणूच्या संसर्गाची नोंद झाली होती. तर राज्यात झिकाचा पहिला रुग्ण जुलै २०२१ दरम्यान आढळला. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पूणेच्या पथकाद्वारे पुरंदर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर व परिंचे येथे पथकाने भेट दिली असता एका ५२ वर्षीय महिलेत हा आजार आढळला होता.

महाराष्ट्रात झिकाचा पहिला रुग्ण जुलै २०२१ मध्ये आढळला. तेव्हापासून ३ जुलै २०२३ पर्यंत राज्यात झिकाचे एकूण २९ रुग्णांची नोंद आहे. तर जानेवारी २०२४ ते आजपर्यंत यंदाच्या वर्षी राज्यात झिकाच्या ८ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी मे- २०२४ मध्ये कोल्हापूरमध्ये एक रुग्ण, मे- २०२४ मध्ये अहमदनगरला १ रुग्ण, जून आणि जुलैला पूणेतील दोन गावांमध्ये ६ रुग्ण आढळले. त्यामुळे यंदाच्या वर्षी राज्यात ८ झिकाच्या रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे.

आरोग्य विभागाच्या उपाय योजना-

दरम्यान आरोग्य विभागाकडून या आजार नियंत्रणासाठी आवश्यक उपाय केल्याचा दावा केला जात आहे. आरोग्य सुविधांनी आपल्या परिसरात एडीस डासापासून मुक्त ठेवण्यासाठी एका नोडल अधिकार्‍याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, राज्यांनी निवासी भाग, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम स्थळे, संस्था आणि आरोग्य सुविधांमध्ये कीटकशास्त्रीय देखरेख बळकट करावी आणि रोगवाहक सूक्ष्मजीव प्रतिबंधक उपक्रम जास्तीत जास्त प्रमाणात राबविण्याबाबत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. हे रुग्ण आढळल्यावर आरोग्य विभागाकडूनही सर्वत्र झिकाबाबत जनजागृतीसह प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले आहे. जनजागृती आणि आयईसी संदेश समाजामध्ये भीती कमी करण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी समाजमाध्यमे आणि इतर मंचांवर सावधगिरीचे आयईसी संदेश देण्याचे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे. किटकनाशक फवारणी, रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षण, संशयितांच्या नमुने तपासणी व उपचाराची यंत्रणा विकसीत केली गेल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाने प्रसिद्धीपत्रकातून सांगितले आहे. झिका विषाणूचा संबंध गर्भाच्या वाढीशी असल्याने विशेष काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

कोणती काळजी घ्यावी?

  • आपल्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. 
  • घराच्या आजूबाजूला पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. 
  • पाणी साठविण्याचे हौद घट्ट झाकणाने झाकावेत. 
  • प्रत्येक आठवड्यात कूलर रिकामे करून स्वच्छ करावेत. 
  • पाणी साठवणुकीच्या हौदात गप्पी मासे पाळावेत. मच्छरदाणी आणि जास प्रतिरोधक औषधांचा वापर करावा. 
  • शरीर पूर्ण झाकले जाईल, असे कपडे घालावेत.

झिका व्हायरसची थोडक्यात माहिती-

  • झिका हा डेंग्यू आणि चिकुन गुनिया सारखा एडिस डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे.
  • एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे झिका व्हायरसचा संसर्ग होतो.
  • झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर या आजाराची लक्षणे तीन -१४ मध्ये निदर्शनास येतात.
  • झिका हा संसर्गजन्य आजार नाही
  • झिका व्हायरसची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत.
  • ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांतील बुबुळाच्या पुढील भागामध्ये जळजळ होणे, स्नायूदुखी, सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळतात.

महाराष्ट्रात झिका विषाणूच्या अलीकडील प्रसारामुळे सार्वजनिक आरोग्याच्या चिंता वाढल्या आहेत. उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये उद्भवणारा, झिका विषाणू प्रामुख्याने एडिस डासाद्वारे प्रसारित केला जातो. झिका विषाणूच्या नियंत्रणासाठी 
सर्वसमावेशक वेक्टर नियंत्रण धोरण लागू करून  यामध्ये सघन फ्युमिगेशन ड्राईव्ह, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे आणि रहिवाशांमध्ये प्रतिबंधात्मक उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक शिक्षण मोहिमांचा समावेश आहे. डासांचे अधिवास कमी करण्यासाठी मच्छर प्रतिबंधक वापरणे, संरक्षणात्मक कपडे घालणे आणि स्वच्छ वातावरण राखणे या महत्त्वावर स्थानिक सरकारेही भर देत आहेत. संक्रमित लोकांना वेळेवर काळजी देण्यासाठी वर्धित निदान सेवा आणि उपचार प्रोटोकॉल स्थापित केले जात आहेत. विशेषत: गर्भवती स्त्रिया, यक्रोसेफलीसारख्या जन्मजात विकृतींशी विषाणूच्या संबंधामुळे बारकाईने निरीक्षण केले जात आहे.

शेवटी, महाराष्ट्राची झिका विषाणूविरूद्धची लढाई ही तेथील आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांच्या लवचिकता आणि समन्वयित प्रयत्नांचा पुरावा आहे. दक्षता राखून आणि प्रतिबंधात्मक पद्धतींचा अवलंब करून, राज्य सार्वजनिक आरोग्याच्या या धोक्याचा प्रभावीपणे सामना करू शकते आणि तेथील रहिवाशांच्या कल्याणाचे रक्षण करू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने

{Ads}


इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या

{Ads}

.
amazon वर एकदा चेक तर करा
सर्व आपल्या बजेटमध्येच आहे,
Watches- Men     Women
Footwear- Men      Women
.


.
amazon वर आज कोणत्या ऑफर्स
.