कृषी शास्त्रज्ञांच्या योगदानाचा शोध

कृषी शास्त्रज्ञांच्या योगदानाचा शोध
कृषी शास्त्रज्ञांच्या योगदानाचा शोध

शेती, मानवी सभ्यतेचा कणा आहे. पीक उत्पादन, रोग प्रतिकारशक्ती आणि शाश्वत शेती पद्धती सुधारण्यात शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे आजची आधुनिक शेती पद्धती आपण अनुभवत आहोत. या लेखात, आपण अशा सात शास्त्रज्ञांच्या आकर्षक कथांचा अभ्यास करू ज्यांनी कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, (Contributions of Agricultural Scientists) ज्यांनी अधिक अन्न-सुरक्षित भविष्यासाठी मार्ग मोकळा केला आहे.

{tocify} $title={Table of Contents}

सॅली फॉक्स ( Sally Fox)

(जन्म:३० डिसेंबर, १९५५, कॅलिफोर्निया)
आपल्या सर्वांना पांढरा कापूस माहीत आहे किंवा कापूस पांढराच असतो हेच सर्वांना ज्ञात आहे, असे देखील म्हणता येईल. परंतु कॅलिफोर्निया येथील स्त्री संशोधक सॅली फॉक्स यांनी कापूस पांढराच असतो ही संकल्पना मोडीत काढली. सॅली फॉक्स यांना जेव्हा तपकिरी रंगाच्या कापसाच्या बिया आढळल्या तेव्हा त्यांनी रंगीत कापसावर संशोधन करावयाचे ठरविले. तपकिरी कापसाचे बी पेरून आलेल्या पिकातून मिळालेला तपकिरी कापूस औद्योगिक दृष्टीकोनातून तपासला गेला. तेव्हा सॅली फॉक्स यांना असे आढळले की तपकिरी रंगाचा कापूस कमी लांबीचा, बारीक आणि जीन मशिनमध्ये प्रक्रिया होण्यास अयोग्य आहे. परंतु काही वर्ष संशोधन केल्यावर त्यांनी तपकिरी कापसाच्या योग्य जाती शोधून काढल्या. तपकिरी कापसाचे दोन प्रमुख फायदे आहेत, एक म्हणजे अशा तपकिरी कापसाला डायींग करण्याची आवश्यकता नसते आणि दुसरा म्हणजे असा कापूस पांढर्‍या कापसाच्या तुलनेने अधिक आग प्रतिबंधक आहे.

जॉन डिअर  John Deere

(फेब्रुवारी ७,१८०४ - मे १७, १८८६)
नांगरचा शोध हा कृषि इतिहासातील फार महत्त्वाचा टप्पा आहे. कृषि इतिहासात अनेक वर्षांपासून लोंखडापासून बनविलेले नांगर उपयोगात आणले जात होते. जॉन डिअर यांनी त्यावर संशोधन करून १८३७ साली स्टील पासून सुधारित नांगर तयार केला. या स्टील नांगराने अमेरिकेत पूर्वीच्या लोखंडी नांगरापेक्षा चांगली कार्यक्षमता दाखविली. जॉन डिअर यांनी निर्मीत केलेल्या स्टील नांगरामुळे जमिनीची पूर्वमशागत सुलभपणे आणि व्यवस्थितपणे करता आली आणि त्यामुळे जमिनीची सुपिकता आणि उत्पादनक्षमता वाढली. नंतर जॉन डिअर यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून अनेक नवीन आणि सुधारित शेतऔेजारे तयार केली, गुणवत्ता आणि चांगला टिकाऊपणासाठी आजही जॉन डिअर यांच्या कंपनीचे नाव आदराने घेतले जाते.

एली व्हीटने Eli Whitney

(डिसेंबर ८, १७६५ ते जानेवारी ८, १८२५)
इ.स. १७९३-१७९४ या काळात कॉटन जीन ह्या यंत्राचा शोध लावण्यासाठी एली व्हीटने ओळखले जातात. कॉटन जीन हे एक मशिन असून त्याद्वारे कापसाचा तंतू कापसाच्या बीपासून (सरकी) वेगळा केला जातो. कापड उद्योगात कापसाचे फार महत्त्व आहे. या यंत्राचा शोध लावण्याअगोदर दक्षिण अमेरिकेत कापसाचा धागा वेगळा करण्यासाठी गुलामांचा वापर होत होता. कॉटन जीन यंत्रामुळे सर्व कामे यंत्राने होऊ लागली, त्यामुळे तेथे कापसाच्या शेतीत वाढ झाली आणि कापड उद्योगाची भरभराट झाली.

सायरस मॅककॉर्मीक  Cyrus McCormick

(फेब्रुवारी १५,१८०९ ते मे १३, १८८४)
सायरस मॅककॉर्मीक यांनी अहोरात्र मेहनत करून वयाच्या २२व्या वर्षी सन १८३१ मध्ये जगातील पहिले यांत्रिक कापणी करणारे यंत्र विकसित केले. त्यांच्या वडीलांनी कापणी यंत्र बनविण्यासाठी त्याअगोदर १५ वर्षे प्रयत्न केले होते. पण त्यांना हवे तसे कापणी यंत्र बनविता आले नाही. त्यांचे प्रयत्न आणि त्यांनी केलेल्या चुका लक्षात घेऊन सायरस मॅककॉर्मीक यांनी हे यंत्र विकसित केले. त्याकाळात कापणी करण्यासाठी फार मोठे मनुष्यबळ लागत होते, म्हणून मानवी शक्ती ला पर्याय म्हणून सायरस मॅककॉर्मीक यांचे यांत्रिक कापणी करणारे यंत्र फार उपयोगी ठरले. सन १८५१ साली क्रिस्टल पॅलेस प्रदर्शनात सायरस मॅककॉर्मीक यांच्या यांत्रिक कापणी यंत्राला सर्वात जास्त बक्षिसे आणि सुवर्णपदक मिळाले. त्यामुळे सायरस मॅककॉर्मीक यांना जगभर प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या कार्याला बघून त्यांना आधुनिक शेतीचे जनक असे म्हटले जाते.

जॉर्ज वॉशिग्टन कार्व्हर George Washington Carver

(जानेवारी १८६४-जानेवारी १९४३)
जॉर्ज वॉशिग्टन कार्व्हर यांनी कृषि माहिती विस्तारात महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी पिक पद्धती, पीक उत्पादन तंत्रज्ञान, शेतमालापासून अन्न पदार्थ बनविण्याचे विविध प्रकार याची माहिती हजारो शेतकर्‍यांपर्यंत पोहचविली. कापूस शेतीला पर्यायी पिके घेण्यासाठी त्यांनी माहितीचा प्रसार करण्याचे मोलाचे कार्य केले. कापूस शेतीला पर्याय म्हणून भुईमूग आणि रताळी या पिकांची शेती करण्यासंबधी त्यांनी शेतकर्‍यांमध्ये जागृती केली. तसेच जॉर्ज वॉशिग्टन कार्व्हर हे प्रगत विचारवंत होते त्यांनी पिकंाच्या कमी उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता कारणीभूत असू शकते यावर अभ्यास करून माती तपासणीची जागृती शेतकर्‍यांमध्ये केली. तसेच त्यांनी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया तंत्रावर सुद्धा बराच शोधपूर्ण अभ्यास केला. म्हणूनच जॉर्ज वॉशिग्टन कार्व्हर यांना कृषि क्षेत्रातील एक शिक्षक, संशोधक, मानवतावादी म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते.

नॉरमन बोरलॉग Norman Borlaug 

(मार्च २५,१९१४-सप्टेबर१२, २००९)
बोरलॉग यांनी मेक्सिको येथे गहू पिकावर संशोधन आणि गव्हाची निरनिराळे तंत्रज्ञान वापरून पैदास करून गव्हावर खूपच यशस्वी संशोधन केले. या संशोधनामुळे गव्हाची गुणवत्ता आणि उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले. संपूर्ण आयुष्य त्यांनी संशोधनात खर्च केले.वाढलेल्या अन्नधान्य उत्पादनामुळे लाखो लोक भूकबळीपासून वाचलेत. त्यामुळे त्यांना हरितक्रातींचे जनक म्हणून संबोधले जाते. त्यांना या संशोधनामुळे १९७०साली नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांना भारताचा दुसरा सर्वाच्च नागरीक सन्मान पद्मविभुषण देण्यात आलेला आहे. गहू पिकावर संशोधन करून त्यांनी असा निकष काढला की गव्हाची मध्यम उंचीची जात उंच जातीपेक्षा जास्त उत्पादन देते, म्हणजेच गव्हाची उंची जर कमी केले की उंची कमी झाल्यामुळे वाचणारी उर्जा अधिक धान्य उत्पन्न देते. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा भरमसाठ वापर आणि भरपूर पाणी शोषणार्‍या पीक पद्धतींचा उपयोग या त्यांच्या संशोधनावर टीका सुद्धा झाली. परंतु त्यांचे नेहमीच असे म्हणणे होते की लोकांनी भुकेने मरण्यापेक्षा माझ्या संशोधनामुळे विकसित केलेले धान्य खाऊन मरणे केव्हाही अधिक चांगले.

फ्रीट्‌झ हॅबर  Fritz Haber 

(९ डिसेंबर,१८६८ -२९ जानेवारी,१९३४)
सन १९०८ साली हॅबर यांनी एक विशेष तंत्रज्ञान विकसित केलं.यात वातावरणातील नायट्रोजन विशिष्ट तंत्राने वनस्पती उपयोगात आणू शकतील या स्वरूपात विकसित करणे. हे तंत्रज्ञान आजसुद्धा वापरले जाते. सन १९१८ साली या तंत्रज्ञानाबाबत हॅबर यांना नोबेल प्राईझ मिळाले. त्या काळी नत्रयुक्त खते वापरात होती, परंतु हॅबर यांच्या संशोधनामुळे नत्रयुक्त खतांची कमी खर्चात निर्मीती होऊ लागली. आजसुद्धा आपण सर्वजण शेती पिकविण्यासाठी ज्या नत्रयुक्त खतांवर अवलंबुन आहोत ती खते हॅबर पद्धतीने बनविली जातात. पुर्वी तृणधान्याचे उत्पन्न अतिशय कमी होते, नत्रयुक्त खतांची कमी खर्चात निर्मीती होऊ लागल्यापासून शेतातील तृणधान्य पिकांने प्रति हेक्टरी उत्पादन अनेक पटींनी वाढले. केवळ हॅबर यांच्या संशोधनामुळेच हे शक्य झाले आणि त्यांच्यामुळेच आज वेगात वाढणार्‍या प्रचंड अशा लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात अन्न पुरवठा होत आहे.

निष्कर्ष

"शेवटी, कृषी क्षेत्रातील या सात शास्त्रज्ञांचे योगदान बहुमूल्य आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधन आणि नाविन्यपूर्ण पध्दतींद्वारे, त्यांनी पीक उत्पादनात सुधारणा केली आहे, रोग प्रतिकारशक्ती वाढवली आहे आणि शाश्वत शेती पद्धतींना चालना दिली आहे. त्यांच्या कार्यामुळे वाढत्या लोकसंख्येचे पोषण करता येत आहे. आपण भविष्याकडे पाहत असताना, हे स्पष्ट आहे की शेतीसमोरील आव्हाने वाढतच जातील. हवामान बदल, मातीचा ऱ्हास आणि पाण्याची टंचाई यासाठी नाविन्यपूर्ण उपाय आणि अत्याधुनिक संशोधनाची आवश्यकता असेल. या सात शास्त्रज्ञांचा वारसा मानवी कल्पकतेच्या सामर्थ्याचे आणि कृषी संशोधनात सतत गुंतवणूक करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देणारा आहे.या कृषी शास्त्रज्ञांच्या कथा वैज्ञानिक प्रगतीसाठी सहकार्य, चिकाटी आणि उत्कटतेचे महत्त्व अधोरेखित करतात.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने

{Ads}


इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या

{Ads}

.
amazon वर एकदा चेक तर करा
सर्व आपल्या बजेटमध्येच आहे,
Watches- Men     Women
Footwear- Men      Women
.


.
amazon वर आज कोणत्या ऑफर्स
.