कृषी विकासाचा नवा मार्ग: शेतकरी मंडळ

Farmers Friend Circle
Farmers Friend Circle

एखाद्या शेतकर्‍याने ठरविले की अनुत्पादक बाबींवर चर्चा करून वेळ वाया घालविण्यापेक्षा फक्त शेती आणि शेतीविषयक घडामोंडींवरच चर्चा करायची तर त्याने जायचे कुठे? फक्त शेतीवरच चर्चा करायचे ठिकाण शोधायचे कोठे? अशा शेतकर्‍यांना आता पर्याय सापडला आहे तो म्हणजे शेतकरी मंडळ.

{tocify} $title={Table of Contents}

शेतकरी मित्र मंडळ: भारतीय शेतीसाठी आशेचा किरण

भारत देशात शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तथापि, शेतकऱ्याचे जीवन अनिश्चिततेने भरलेले असते. बेभरवशाचा पाऊस, बाजारातील चढ-उतार अशा अनेक समस्यांचा सामना करत शेतकरी शेती व्यवसाय करीत असतो. या समस्यांना सामोरे कसे जायचे, विविध संकटाना सामोरे कसे जायचे, याबाबत चर्चा  कुठे करायची, या सर्व प्रश्नांना उत्तर म्हणजे शेतकरी मंडळ होय. शेतकरी मित्र मंडळातून शेतकऱ्यांना शेतीचे ज्ञान, संसाधने आणि सर्वोत्तम पद्धती याबाबत माहिती मिळू शकते, ज्यामुळे शेती व्यवसायातील उत्पादकता आणि नफा वाढू शकतो. शिवाय, शेतकरी मंडळ शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करू शकते, ज्यामुळे त्यांना चांगल्या किमतीची वाटाघाटी करता येतात आणि नवीन संधी मिळू शकतात. हा लेख भारतातील शेतकरी मित्र मंडळांचे महत्त्व शोधून काढतो, शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणात, शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आणि लवचिक ग्रामीण समुदायांच्या निर्मितीमध्ये त्यांची भूमिका अधोरेखित करतो.

शेतकर्‍यांचे जीवन अभ्यासले तर त्यांना नोकरी करणार्‍यांसारखे रोज विशिष्ट तास काम नसते, कधी-कधी भरपूर काम तर काही वेळा अजिबात काम नसते. जेव्हा शेतकर्‍यांना फावला वेळ मिळतो तेव्हा त्यांनी काय करायचे? जसे दोन डॉक्टर एकमेकांना भेटतात तेव्हा पेंशट आणि ऑपरेशनवरच चर्चा करतात, दोन वकील भेटतात तेव्हा त्यांच्या केसेसवर आणि गुन्हेगारीवर चर्चा करतात तसेच जेव्हा दोन शेतकरी भेटतात तेव्हा ते खरोखरच शेतीवरच चर्चा करतात का की शेती सोडून इतर सर्व बाबींवर गप्पा मारतात? एखाद्या शेतकर्‍याने ठरविले की अनुत्पादक बाबींवर चर्चा करून वेळ वाया घालविण्यापेक्षा फक्त शेती आणि शेतीविषयक घडामोंडींवरच चर्चा करायची तर त्याने जायचे कुठे? फक्त शेतीवरच चर्चा करायचे ठिकाण शोधायचे कोठे? अशा शेतकर्‍यांना आता पर्याय सापडला आहे तो म्हणजे शेतकरी मंडळ.

शेतकरी मंडळाची रचना 

शेतकर्‍यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करणे आणि त्यासोबत विविध योजनांची चर्चा करणे आणि योजना प्रभावीपणे राबविणे हे शेतकरी मंडळाचे मुख्य उद्देश असतात. कृषी खाते, कृषी विज्ञान केंद्र आणि बँकांच्या माध्यमातून आता शेतकरी मंडळे स्थापन होत आहेत. एकट्या शेतकर्‍याला योजना राबविणे अवघड असते मात्र शेतकरी मंडळ स्थापन करून योजना राबविणे सोपे जाते. शेतकरी मंडळात कमीतकमी दहा सदस्य असावेत, दहाच्यावर सदस्य संख्येला मर्यादा नसते. असे शेतकरी मंडळ बॅक, नाबार्ड, शासन, कृषी विद्यापीठ आणि गावातील शेतकर्‍यांमधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम करू शकते. तसेच इतर शेतकरी मंडळांशी आणि विविध संस्थांशी समन्वय ठेवण्याचे काम ही शेतकरी मंडळ करू शकते. शेतकरी मंडळात सरसकट कुणीही येऊन सभासद होऊ शकत नाही. येथे सभासद होण्यासाठी फार किचकट आणि कठीण नसल्यातरीही काही साधारण अटींची पुर्तता मात्र शेतकर्‍यांना करावी लागते. शेतकरी मंडळाचा सभासद होणारा इच्छुक शेतकरी बँक कर्ज थकबाकीदार नसावा, आपणाला माहीत असलेले ज्ञान इतरांना देण्याची त्याची तयारी असावी.

शेतकरी मंडळाचे उपक्रम 

शेतकरी मंडळ अनेक उपक्रम राबवू शकतात जसे शेतीविषयक कार्यक्रमांचा वार्षिक कृती आराखडा तयार करणे, शेती तज्ज्ञांना बोलावून नवीन तंत्रज्ञान सभासद शेतकर्‍यांपर्यंत पोहचविणे, त्यांच्यामार्फत कृती प्रात्यक्षिक, शेतीच्या विविध पद्धती, मत्स्योत्पादन, मधमाशीपालन, शेळीपालन, निरनिराळ्या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयांवर शेतकर्‍यांचे अभ्यासदौरे आयोजित करणे, शेती विषयक जोडधद्यांची माहिती शेतकर्‍यांना उपलब्ध करणे आणि यशस्वी शेतीपूरक उद्योगांच्या ठिकाणी भेटी आयोजित करणे, नवीन-उच्च प्रतीचे बियाणे, खते आणि किटकनाशकांची व्यवस्था करणे आणि त्यांच्या उपलब्धतेसाठी पाठपुरावा करणे, प्रयोगशील शेतकर्‍यांच्या शेतीला भेटी देणे, नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी कृषिविषयक प्रदर्शनाला भेटी देणे, विविध विषयांवर जसे फळपिके, फुलशेती इ. विषयांवर कार्यशाळा आयोजित करणे, माती परीक्षणासाठी जागृती निर्माण करणे, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आणि शेतमाल प्रक्रिया यासारख्या विषयांवर चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करणे, महिला बचत गटांची स्थापना करणे, पर्यावरण संरक्षणावर जागृती अभियान चालविणे. विशेष म्हणजे शेतकरी मंडळाचे कार्य थेट शेतीशी संबधितच विषयांशी निगडीत असते, असे नव्हे. तर हे मंडळ भूजल परीक्षण, किचन गार्डन, झाडे लावणे, सामुदायिक साक्षरता, बिगर शेतीवर आधारित स्वउद्योग यांवरही कार्यशाळा आयोजित करू शकते.

भारतातील शेतकरी मित्र मंडळाचे महत्त्व 

1. भावनिक आधार: शेतकरी मित्र मंडळामध्ये छोटे शेतकरी, मोठे शेतकरी एकत्र भेटतात, त्यांच्या मध्ये वैचारिक देवाण घेवाण होते. त्यामुळे शेतकऱ्यांमधील तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होऊन शेतकऱ्यांमध्ये जिद्द, प्रोत्साहन तयार होते. 
2. ज्ञानाची देवाणघेवाण: शेती व्यवसायाच्या सर्वोत्तम पद्धती, आधुनिक शेतीची नवीन तंत्रे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची देवाणघेवाण सुलभपणे होते. यामुळे शेतीसंबंधी चालू घडामोडी सर्व शेतकऱ्यांना समजतात. 
3. कौशल्य विकास: संसाधने, उपकरणे आणि कौशल्य विकास करण्यास प्रोत्साहित करते.
4. मार्केट ऍक्सेस: शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडते, चांगल्या किंमतीची प्राप्ती आणि वाढीव उत्पन्न सक्षम करते.
5. सामाजिक सुरक्षा: शेतकऱ्यांसाठी सुरक्षिततेचे जाळे प्रदान करते, संकटाच्या वेळी समर्थन सुनिश्चित करते.
6. सशक्तीकरण: शेतकऱ्यांची सौदेबाजी करण्याची क्षमता वाढवते, त्यांना खरेदीदार आणि पुरवठादारांशी वाटाघाटी करण्यास सक्षम करते.
7. शाश्वत शेती: पर्यावरणास अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन देते, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करते आणि हवामान बदल कमी करते.
8. ग्रामीण विकास: ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, जीवनमान आणि समुदायांमध्ये सुधारणा करण्यासाठी योगदान देते.
9. इनोव्हेशन: नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रयोगांना प्रोत्साहन देते, कृषी उत्पादकता सुधारते.
10. सरकारी सहाय्य: सरकारी योजना, अनुदाने आणि उपक्रमांपर्यंत पोहोचणे सुलभ करते, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो.

शेतकरी मंडळांचे हे उपक्रम आणि त्यामूळे होणारे फायदे पहाता आता प्रत्येक गावात शेतकरी मंडळ स्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे. अनुत्पादक गोष्टींवर चर्चा करित गावातील कट्ट्यांवर बसून वेळ वाया घालविण्यापेक्षा शेतकर्‍यांनी स्वविकासासोबत गावाचा विकास साधण्यासाठी शेतकरी मंडळात प्रवेश घेतला पाहिजे. शेतकरी मंडळ कसे स्थापन करायचे याविषयी माहिती कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाशी संपर्क साधून मिळविता येते.

निष्कर्ष

शेतकरी मित्र मंडळ ही भारतीय शेतकऱ्यांसाठी त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या  आव्हानांना तोंड देणारी एक महत्त्वाची सहाय्यक यंत्रणा ठरू शकते. भावनिक आधार, ज्ञानाची देवाणघेवाण, कौशल्य विकास, बाजारपेठेची ओळख, सामाजिक सुरक्षा, सक्षमीकरण आणि आधुनिक व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन, ही मंडळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा करू शकतात. भारताचे कृषी क्षेत्र जसजसे विकसित होत आहे, तसतसे शेतकरी मित्र मंडळांचे महत्त्व वाढत जाईल.  सरकार, कृषी तज्ञ आणि शेतकऱ्यांनी या मंडळांचे मूल्य ओळखले पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन आणि मजबूत करण्यासाठी कार्य केले पाहिजे. आपण शेतकरी मित्र मंडळ या महत्त्वपूर्ण उपक्रमाला प्राधान्य देऊ आणि अन्न-सुरक्षित आणि समृद्ध भारतासाठी योगदान देऊन शेतकरी भरभराटीस येऊ शकतील असे एक पोषक वातावरण निर्माण करू शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने

{Ads}


इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या

{Ads}

.
amazon वर एकदा चेक तर करा
सर्व आपल्या बजेटमध्येच आहे,
Watches- Men     Women
Footwear- Men      Women
.


.
amazon वर आज कोणत्या ऑफर्स
.