परीक्षांचा हंगाम जवळ आला की त्यासोबत चिंता, तणाव आणि अनिश्चितता वाढते. परीक्षा कोणतीही असली तरी मुलांच्या मनावर टेन्शन येतेच. परीक्षा हा शैक्षणिक प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. परीक्षा केवळ तुमचे ज्ञानच तपासात नाही तर वेळ व्यवस्थापन, मानसिक सहनशक्ती आणि धोरणात्मक नियोजनाची ही कसोटी असते. बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी, परीक्षेचे दिवस चिंता आणि तणावाने भरलेले असू शकतात. तथापि, योग्य दृष्टीकोन आणि मानसिकतेसह, परीक्षांची तयारी ही एक नियोजन आणि व्यवस्थापित प्रक्रिया असू शकते. हा लेख तुम्हाला परीक्षेची कार्यक्षमतेने तयारी करण्यात, तणाव कमी करण्यासाठी आणि तुमच्या यशाची शक्यता वाढवण्यासाठी व्यावहारिक धोरणे आणि टिप्स यांद्वारे मार्गदर्शन करेल.
{tocify} $title={Table of Contents}
परीक्षेच्या तयारीचे सूत्र
परीक्षेची भीती ही सर्वानाच असते. अजुनपर्यंत जो वर्गात पहिल्या पाच क्रमांकात येत राहीला आहे, त्यालाही भिती असते की त्याचा क्रमांक कुणी हिरावून घेवु नये. तसेच जो वर्गात सर्वात शेवटी येतो, त्याला नापास होण्याची भिती असते. दहावीत किंवा बारावीत प्रवेश घेतल्यापासुन पालकांचे एकच वाक्य सतत कानी पडते की हे महत्वाचे वर्ष आहे, अभ्यासाला लागा.
परीक्षेची भीती सर्वांना
बोर्ड परीक्षा, स्पर्धा परीक्षा, सीईटी, नीट(एनइइटी), एमपीएससी, युपीएससी अशा परीक्षांचा विचार येताच सर्व मुलांच्या मनात एकप्रकारची भीती निर्माण होत असते. आपल्या आजुबाजूला आणि आपल्या समाजात या परीक्षांबद्दल सतत चर्चा होत असते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होत असतो. परीक्षा जसजशी जवळ येत असते तसतशी ती मुलेे विद्यार्थी आत्यांतिक भितीने ग्रासले जातात. एका बाजूला अभ्यासाचे ओझे असते दुसर्या बाजुला पालक वर्गाच्या अपेक्षा असतात. आपल्या प्रचंड अपेक्षांचे ओझे पालक सातत्याने मुलांच्या मनावर लादत असतात. जी मुले नियमित अभ्यास करतात ती देखिल अशा अपेक्षांनी नेहमीच टेन्शमध्ये असतात. अशा मुलांच्या मनावर सतत भविष्यांतील चिंता रेंगाळत असतात. मार्क मिळविण्याच्या या स्पर्धेत मुले होरपळून निघत असतात. अमूक अमूक कॉलेजाला ऍडमिशन मिळाले पाहिजे. अमूक मित्रापेक्षा जास्त मार्क्स मिळाले पाहिजे किंवा अमूक एका परीक्षेसाठी निवड झाली पाहिजे वगैरे अशा प्रचंड अपेक्षाचे ओझे घेऊन तो विद्यार्थी अभ्यास करतांना त्यांच्या डोक्यामध्ये वहात असतो. असे ओझे वहाणे हे भविष्याच्या आणि करीअरच्या दृष्टीने कितीही योग्य असले तरी त्या ओझ्याला आणि ते ओझे यशाकडे नेण्याच्या या स्पर्धेला समोरे कसे जायचे, यावर विचार करायला हवा.
विद्यार्थ्याची जबाबदारी-
मार्क्स किती मिळतील, कोणते कॉलेज मिळेल किंवा स्पर्धा परीक्षेनंतर कोणती पोस्ट मिळेल याचा विचार तर अभ्यास करतांना करायला हवाच. मात्र केवळ विचार आणि चिंता करून चालणार नाही, त्यासाठी नियोजपूर्वक अभ्यास करायला हवा. वाचन, मनन व लेखन हया अभ्यासाच्या प्रमुख पद्धती आहेत. आपल्या परीक्षेचा पेपर पॅटर्न बघूनच आपली अभ्यास पद्धती ठरवायला हवी. काही वेळेस आपल्या जवळच्या मित्रांशी चर्चा करून, शिक्षकांच्या संपर्कात राहून, कोचिंग क्लास किंवा ऑनलाईन क्लास लाऊनही अभ्यास होऊ शकतो. कोणती एक बाब करून कंटाळा आला तर दुसर्या पद्धतीने अभ्यासाचा सराव आपण करू शकतो. सर्वच विषय एकाच वेळेस तयार न करता आपल्याकडे असलेला वेळ व विषयांची काठीण्य पातळी या नुसार आपण अभ्यासाचे स्वत:चे वेळापत्रक तयार करावयाचे असतेे.
पालकांची कर्तव्य-प्रत्येक परीक्षांमध्ये आपल्या पाल्यांने घवघवीत यश संपादन करावे ही प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. किंबहुना भविष्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या अपेक्षा असणे रास्त आहे. परंत एकदा की या अपेक्षांची जाणीव पाल्यांना दिली गेली तर मग या अपेक्षांच्या कसोटीला आपला पाल्य उतरतो की नाही हे बघणे देखील पालक वर्गाचे काम आहे. पाल्यांना उपलब्ध करून दिलेले अभ्यासाचे वातारवरण, वेळ, लागणारी शैक्षणिक सामुग्री इ. यातून पाल्य नेमका काय करता हे तपासणेही आवश्यक आहे. इतके इतके टक्केच मार्क्स मिळाले पाहीजे असे टोचून न सांगता, मला खात्री आहे तु चांगला अभ्यास करून खूप चांगले मार्क्स मिळून शकतो, असे होकारात्मक बोलायले हवे. अशा सकारात्मतक संवादाने विद्यार्थ्याच्या मनावर अकारण दडपण येत नाही व तो पालकांशी मनमोकळया वातवरणात संवाद करतोे.
मुलांचे आरोग्य आणि करमणूक
विद्यार्थ्यांनी सतत अभ्यासच केला पाहीजे तरच चांगले मार्क्स मिळविता येतात असेही समजणे चुकीचे आहे. अभ्यासाच्या वेळाबरोबर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे परीक्षाकाळात पालक वर्गाची प्रमुख जबाबदारी आहे. परीक्षा काळात हलकासा व्यायाम व चांगला आहार याकडे कटाक्ष असला पाहीजे. विद्यार्थी अभ्यासाला कंटाळतात अशा वेळी थोडी करमणूक देखिल त्याला पुढील अभ्यासासाठी प्रोत्साहन देत असते. अशा वेळेस पालकांना आपल्या पाल्यांच्या परीक्षा काळात सर्व कृति समतोल कशा राहतील याकडे विशेष लक्ष दिले पाहीजे.
सुसंवाद
बर्याचदा पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुले दाबली जातात. परीक्षा काळात परीक्षेची प्रंचड भिती त्याला ग्रासते व विद्यार्थी ताणतणावात राहतो. पालकांनी याबाबतील सतर्क राहून विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कसा कमी होईल याकडे वेळीच लक्ष दिले पाहीजे.
अभ्यासाचे नियोजन असे करा
- विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे स्वत:चे वेळापत्रक तयार करावे.
- त्या वेळापत्रकानुसार त्या त्या विषयांचा अभ्यास वेळेत पुर्ण करावा.
- सर्वच विषयांचा अभ्यास वाचून होत नाही. काही विषयांच्या बाबतीत लेखन, मनन, स्मरण, चर्चा इ. अशा वेगवेगळ्या पद्धती स्विकाराव्यात.
- विषयातील एखादा भाग, एखादे प्रकरण, किंवा एखादी गुंतागुंतीची संकल्पता समजत नसेल तर त्याचा फार विचार न करता तो भाग काही वेळेपर्यंत बाजुला ठेवावा आणि पुढील अभ्यास करावा.
- अभ्यास करतांना ताणतणाव येणार नाही याबाबत जाणीव ठेवावी, तसे झाल्यास प्रथम त्याचे निवारण करावे मगच अभ्यास करावा.
- काही विषयांच्या अभ्यासाचा काही भाग पुन्हा पुन्हा तयार करावा लागतो अशा गोष्टींना अर्थातच जास्त वेळ द्यावा लागतो. याचीही जाणीव ठेवावी.
- अभ्यास किती वेळ केला पाहीजे हे फार महत्वाचे नसून उपलब्ध वेळेत किती चांगला अभ्यास झाला हे फार महत्वाचे आहे. म्हणून तासन् तास बसून वाचन केल्याने अभ्यास होईलच असे नाही. नियोजपूर्वकच अभ्यास असायला हवा.
- अभ्यासासाठी सातत्य ठेवणे अतिशय गरजेचे आहे. निदान परीक्षा काळात वाचन लेखनाच्या संपर्कात सतत असले पाहीजे.
- सुरूवातीपासून आपल्या दैनंदिन कार्यक्रमात फारसा बद्दल करू नये. अति जागरण यासारखे अचानक केलेले बदल आरोग्यासाठी आणि एकूणच परीक्षेच्या तयारीसाठी प्रतिकूल ठरू शकतात.
- खेळ किंवा करमणुकीच्या वेळा आवश्यक असतात. त्याने ताणतणाव कमी होवून अभ्यासाची गोडी टिकून राहते, तसेच आरोग्य चांगले राहते.
- परीक्षाच्या कालावधीत पेपर झाल्यांनतर त्याचा फारसा विचार न करता पुढील पेपरची तयारी करावी. झालेल्या पेपरच्या अडचणीचा फारसा विचार करू नये.
- परीक्षा देणे हेच उद्दिष्ट ठेवावे. मार्काचा विचार करू नये. परीक्षा चांगली पार पडली म्हणजे निकालही चांगला मिळतो याबद्दल खात्री बाळगावी.
- अभ्यासाची चांगली तयारी असणे ही बाब विद्यार्थ्यांना मानसिक बळ देते.
- परीक्षेचे दिवस हे इतर दिवसांसारखेच असतात, विनाकारण मनावरचा ताण वाढवू नये.
निष्कर्ष
परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रभावी रणनीती, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक विचारसरणीची आवश्यकता असते. स्पष्ट उद्दिष्टे ठरवून, अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून, सक्रिय शिक्षण तंत्राचा सराव करून आणि तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेऊन, तुम्ही अगदी कठीण परीक्षांनाही आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी सुसज्ज राहू शकतो. अभ्यासाच्या चांगल्या सवयींचा समावेश करून, तुमचा वेळ हुशारीने व्यवस्थापित करून आणि तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेऊन तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या परीक्षेला जाऊ शकता. शेवटी, परीक्षा ही तुमची मेहनत आणि ज्ञान प्रदर्शित करण्याची एक संधी असते आणि योग्य तयारीने तुम्ही तुम्हाला हवे ते निकाल मिळवू शकता.