Gram cultivation |
रब्बी हंगामात घेतल्या जाणा-या पिकांपैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे.
हरभरा लागवडीसाठी जमीन
मध्यम ते भारी जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. तसेच सामु 6.5 ते 7.5 या दरम्यान असावा.
हरभरा लागवडीसाठी पूर्व मशागत-
खरीपाचे पिक निघाल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळव्याच्या दोन पाळया दयाव्यात. काडीकचरा वेचुन जमीन सव्च्छ करावी. खरीपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
हरभरा लागवडीसाठी पेरणीची वेळ-
हरभरा हे रब्बी हंगामातील पीक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जेथे सिंचनाची सोय नसेल तेथे २५ सप्टैंबर नंतर पेरणी करावी.बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते.
हरभरा लागवड पेरणीची पध्दत-
- विजय – हेक्टरी ६५ ते ७० किलो
- विशाल, दिग्विजय, विराट- हेक्टरी १०० किलो
- पीकेव्ही-४, कृपा वाणा करीता १२५-१३० किलो /हे.
हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो.
हरभरा लागवडीसाठी बीजप्रक्रीया -
मर मुळकुज किवा मानकुज रोगांपासुन बचाव करण्यासाठी पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रीया करावी.-250 ग्रॅम रायबियम प्रति किलो बियाण्यास गुळच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. असे बियाणे तासभर सावलीत सुकवावे मग पेरणी करावी. यामुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते व मुळांवरील नत्राच्या ग्रंथी वाढतात व पिकची वाढ चांगली होते.
हरभरा लागवडीसाठी खतांची मात्रा-
हरभ-याला हेक्टरी २५किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ३०किलो पालाश खताची आवश्यकता असते.
गंधक किंवा जस्ताची कमतरता असणा-या जमिनीत नत्र व स्फुरद सोबत २० किलो गंधक किंवा २५ किलो झींक फॉस्फेट प्रती हेक्टरी पेरणीपूवीर् जमिनीत पेरुन दयावे.
पीक फुलो-यात असताना व घाटे भरण्याच्या अवस्थेमध्यें पाण्याचा ताण पडल्यास २% युरीयाची फवारणी करावी.
आंतरमशागत-
पीक २० दिवसांचे झाल्यावर पहिली कोळपणी करावी व एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवा खेळती व पिकांची वाढ चांगली होते.
तण नियंत्राणासाठी तणनाशक वापरावे पेंडामेथीलीन २.५लिटर/ हे. प्रमाणे ५००लिटर पाण्यातून फवारावे.
पाणी व्यवस्थापन
- पहिले पाणी मध्यम जमिनीसाठी २० ते २५ दिवसांनी
- दुसरे पाणी ३० ते ३५दिवसांनी
- तिसरे पाणी ६५ ते ७०दिवसांनी दयावे.
- भारी जमिनी असल्यास २ पाळया पुरेशा होतात.
- पहिले पाणी-३० ते ३५दिवसांनी
- दुसरे पाणी-६५ ते ७०दिवसांनी
प्रत्येक वेळी पाणी प्रमाणात पाणी दयावे साधारणत ७ ते ८ सें.मी. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो.
हरभरा काढणी-
हरभरा पीक ११० ते १२०दिवसांमध्ये तयार होते. हाभ-याच्या परिपक्वतेच्या काळात पाने पिवळी पडतात. घाटे वाळू लागतात त्यानंतर पिकाची कापणी करावी.अन्यथा पीक जास्त वाळल्यावर घाटे गळ होऊन नुकसान होते. त्यानंतर एक दोन दिवस काढलेला हरभरा वाळवून मळणी करावी.
उत्पादन-सुधारीत वाणांचा व तंत्रज्ञानाचा वापर करुन हरभ-याची लागवड केल्यास सरासरी २५ ते ३० किवंटल /हे. उत्पादन मिळू शकते.संकलन-
२. श्री तुषार रामदास बिरारी
कृषि तंत्र विदयालय, धुळे