Home Electrical Safety |
{tocify} $title={Table of Contents}
पॉवर स्मार्ट : घरी इलेक्ट्रिकल सेफ्टी कशी राखायची
जितेंद्रच्या छोट्या भावाला विजेचा शॉक लागला म्हणून त्याच्या घरातील सर्वजण त्याच्या छोट्या भावाला घेऊन तातडीने दवाखान्यात गेले. अनुराग अपार्टमेंट मधील सर्वांना जेव्हा ही बातमी कळाली, तेव्हा प्रत्येकाला वाईट वाटले. मोठ्यांकडून तर अनपेक्षितरित्या खालील संवाद ऐकायला मिळाले.
‘‘जितेंद्रच्या आईला तर बाळाकडे बघायला वेळच नसतो, सदा न सदा टिव्हीत डोक खूपसून बसतेय ती!’’- खर्डे आजोबा.‘‘मुलांचे केवळ लाड करून उपयोग नाही तर त्यांना चांगल्या सवयीही लावायला हव्यात.’’-रमा काकू.
‘‘लहान बाळाचा हात पोहचेल, इतक्या खाली विजेचे सॉकेट बसवायचेच कशाला?’’- निर्मला आजी.
असे प्रत्येकजण आपापल्यापरीने घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत होते. जगत सर्व संवाद कान लावून ऐकत होता, यावर त्याला काहीतरी बोलायचे होते, मात्र ही योग्य वेळ नाही, असे त्याला वाटल्याने तो थांबला.
संध्याकाळी जितेंद्रचा परिवार अपार्टमेंटमध्ये दाखल झाला. ही वार्ता कळताच सर्वजण त्याच्या घरी गोळा झाले. जितेंद्रचा लहान भाऊ आता शांत झोपला होता. सर्व गोळा झाल्यावर जितेंद्रच्या वडीलांनी माहिती देण्यास सुरूवात केली,‘‘ खेळता खेळता बाळाने भिंतीवर बसविलेल्या विद्युत सॉकेटच्या छिद्रामध्ये बोट घुसवले आणि त्याला शॉक लागला. नेमके त्यावेळी बटणही सुरुच होते. वेळीच माझ्या लक्षात आले आणि मी बटण बंद करून त्याला सोडविले आणि डॉक्टरांकडे घेऊन गेलो. बाळ सद्या धोक्याबाहेर असून त्याच्या हालचालींवर विशेष लक्ष देण्याचे डॉक्टरांनी आता सुचविले आहे. तुम्ही सर्वांनी येथे येऊन अतिशय आस्थेने चौकशी केली आणि काही जणांनी ङ्गोन करून चौकशी केली, तसेच डॉक्टरांनाही बाळाकडे विशेष लक्ष देण्याचे सुचविले याबद्दल सर्वांचे आभार.’’
यावर खर्डे आजोबा काहीतरी बोलणार, त्याच्याअगोदरच जगत म्हणाला, ‘‘ जे झाले ते झाले, आता उणीदुखणी काढण्यापेक्षा यापुढे कोणती काळजी घ्यावी, याची चर्चा करायला हवी. खरेतर जितेंद्रच्या वडीलांनी मुद्दामुनच भिंतीवरील सॉकेट खूप खाली बसविलेले नाहीत. फ्लॅट घेण्यापूर्वीच इलेक्ट्रीक ङ्गिटींग झालेली असते, त्यामुळे ती हवी तशी स्विकारावी लागते. तसेच केवळ जिज्ञासा म्हणून भिंतीवर बसविलेल्या विद्युत सॉकेटच्या छिद्रामध्ये खिळे किंवा धातूच्या पिना किंवा बोट घालण्याची प्रवृत्ती लहान मुलांमध्ये आढळून येते. सॉकेटचे बटण चुकून चालू स्थितीत असले किंवा हे बटण प्रावस्था तारेला जोडण्याऐवजी चुकीने उदासीन तारेला जोडलेले असले तर त्या मुलाला विजेचा धक्का बसण्याची शक्यता असते.हा धोका टाळण्यासाठी मुलांचे हात पोहोचणार नाहीत एवढ्या उंचीवर सॉकेटस् बसवावीत. सॉकेटला विद्युत उपकरण जोडलेले नसेल अशा वेळी ते सॉकेट योग्य त्या प्लगने झाकून ठेवावे.’’
‘‘पण आपल्या प्रत्येक घरात तर सॉकेटस् खूप खाली बसविलेली आहेत, असे तू मघाशीच सांगितले, यावर काही उपाय आहे का?’’चिंगीने नेहमीप्रमाणे मध्येच प्रश्न विचारला.
‘‘यावर अगदी सोपा उपाय आहे. सॉकेटला जोडणार्या विद्यूततारा आतमधूनच वेगळ्या करा. त्यामुळे सॉकेटमध्ये वीज येणारच नाही. अर्थात ही सॉकेट बंद अवस्थेतच राहतील. मुले मोठी होईपर्यंत खालच्या सॉकेटस् ऐवजी वरच्या सॉकेटस् वरूनच कामे भागवावी लागतील.’’ जगतचा हा उपाय सर्वांना पटला. प्रत्येक क्षणाला लहान मुलांकडे कोण लक्ष ठेवणार, त्याऐवजी मुलांचा हात पोहचतील अशी सॉकेटस् बंद करणे हाच एकमेव पर्याय सर्वांनी मान्य केला आणि जगतने दिलेल्या माहितीचे सर्वांनी स्वागत आणि कौतुक केले.
जगतने दिलेली सामान्य माहिती उपयुक्त तर आहेच. मात्र खालील लेख पूर्ण वाचल्याशिवाय आपणास विद्युत सुरक्षेविषयी पूर्णपणे माहिती मिळणार नाही.
तुम्ही घरात विद्युत सुरक्षा कशी राखता?
अपघात, आग आणि दुखापती टाळण्यासाठी घरामध्ये विद्युत सुरक्षितता राखणे महत्त्वाचे आहे. येथे काही आवश्यक टिपा आहेत:
नियमित तपासणी:
तारा, प्लग आणि सॉकेट्स नियमितपणे नुकसानीसाठी तपासा. तुटलेल्या किंवा उघड्या पडलेल्या तारा त्वरित बदला किंवा दुरुस्त करा.
योग्य उपकरणे वापरा:
सुरक्षा प्रमाणपत्रांसह उपकरणे आणि विद्युत उपकरणे वापरा. एक्स्टेंशन कॉर्ड ते वाहून घेत असलेल्या लोडसाठी रेट केले आहेत याची खात्री करा.
विद्युत उपकरणे पाण्यापासून दूर ठेवा:
पाण्याच्या स्त्रोतांजवळ विद्युत उपकरणे वापरणे टाळा. स्विचेस किंवा उपकरणे चालवण्यापूर्वी हात कोरडे करा. सिंक, बाथटब किंवा स्विमिंग पूल यासारख्या पाण्याच्या स्त्रोतांजवळ विद्युत उपकरणे वापरणे टाळा.
ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्टर्स (GFCIs): स्थापित करा:
स्वयंपाकघर, स्नानगृह आणि बाहेरील आउटलेट यांसारख्या पाण्याचे स्रोत असलेल्या भागात ॠऋउख स्थापित करा. ॠऋउखी जेव्हा विद्युत् प्रवाहात असमतोल आढळतात तेव्हा वीज बंद करून विद्युत शॉक टाळू शकतात.
सर्किट ब्रेकर्स आणि फ्यूज:
तुमच्या इलेक्ट्रिकल गरजांसाठी तुमचे सर्किट ब्रेकर्स आणि फ्यूज योग्य आकाराचे आहेत याची खात्री करा. ओव्हरलोड सर्किटमुळे विद्युत आग होऊ शकते.
वापरात नसताना बंद करा:
वापरात नसताना उपकरणे बंद करा आणि चार्जर अनप्लग करा. हीटर्ससारखी उच्च-ऊर्जा उपकरणे कधीही दुर्लक्षित ठेवू नका. खराब झालेल्या कॉर्ड किंवा दोषपूर्ण प्लगसाठी उपकरणे नियमितपणे तपासा.
वायर व्यवस्थित हाताळा:
रग्ज किंवा फर्निचरच्या खाली वायरींची फिटींग करू नका. गोंधळ टाळण्यासाठी वायर फिटींगचे योग्य नियोजन करा.
लोड वितरित करा:
एका सॉकेटमध्ये अनेक उपकरणे प्लग करणे टाळा. ओव्हरलोडिंग टाळण्यासाठी सर्किट ब्रेकर वापरा.
जुने वायरिंग अपग्रेड करा:
जुन्या घरांमध्ये असलेली कालबाह्य विद्युत प्रणाली बदला.
लाइट बल्ब:
लाईट फिक्स्चरसाठी योग्य वॅटेज वापरा. फिक्स्चर ओव्हरलोड केल्याने ते जास्त गरम होऊ शकते आणि संभाव्यतः आग लागते.
बाल सुरक्षा
न वापरलेल्या आउटलेटवर चाइल्ड-प्रूफ कव्हर्स बसवा. मुलांना आउटलेटमध्ये वस्तू घालण्यापासून रोखण्यासाठी छेडछाड-प्रतिरोधक आउटलेट वापरा.
सुरक्षितता शिकवा:
मुलांना विजेच्या धोक्यांबद्दल शिक्षित करा.
नियमित तपासणी:
व्यावसायिक इलेक्ट्रिशियनला बोलावून तुमच्या घराच्या विद्युत प्रणालीची नियमितपणे तपासणी करा. हे संभाव्य समस्या ओळखण्यात आणि विद्युत धोके टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे. दुरुस्ती किंवा अपग्रेडसाठी परवानाधारक इलेक्ट्रिशियन भाड्याने घ्या. विद्युत प्रणालीच्या नियमित तपासणीचे वेळापत्रक करा.
आपत्कालीन प्रक्रिया जाणून घ्या:
मुख्य वीज पुरवठा कसा बंद करायचा ते शिका. विद्युत आग लागण्यासाठी योग्य अग्निशामक यंत्र ठेवा.
या पद्धतींचे पालन करून, तुम्ही तुमच्या घरातील विजेशी संबंधित जोखीम लक्षणीयरीत्या कमी करू शकता. या टिपांचे अनुसरण करून, तुम्ही घरामध्ये विद्युत सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत करू शकता आणि विजेचे झटके, आग आणि इतर धोके टाळू शकता.