Revival of old gardens |
देशात तसेच महाराष्ट्रात फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असून फळांचे उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. तथापि बागा कालांतराने जुन्या होतात आणि त्याची उत्पादकता घटते. नैसर्गिकपणे झाडाचे उत्पन्न देण्याचे प्रमाण घटते.यासाठी अनेक कारणे असली तरी अशा बागांचे पुनरूज्जीवन करणे शक्य असते.
{tocify} $title={Table of Contents}
जुन्या बागांचे उत्पन्न घटण्याची कारणे -
- झाडास फळे कमी/अत्यल्प लागतात.
- मुलत: लागवड चुकीच्या हवामानात झाली असेल तर
- सतत अन्नद्रव्यांचा अपुरा पुरवठा
- चुकीच्या वाणांची निवड
- रोग किडींचा प्रादुर्भाव
- झाडांचे आयुष्यमान जास्त झाल्यामुळे वाढ आणि उत्पादकतेत नैसर्गिक कमी.
जुन्या बागांची लक्षणे-
- फांद्या वाळणे.
- पाने पिवळी होणे, पानगळ, फुलगळ, फळगळ होणे.
- फळांची गुणवत्ता घटणे.
- सर्व बाग किंवा काही झाडे मरणे.
- सर्व बाग किंवा काही झाडे मरणे.
- रोग किंडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव.
- झाड तजेलदार दिसत नाही.
- झाडांची वाढ खुंटते.
जुन्या बागांची पुनरूज्जीवनाची पद्धत-
बहुतेक सर्व फळझाडांचे पुनरूज्जीवन करणे शक्य असले तरी प्रामुख्याने आंबा, आवळा, पेरू, लिची, लिंबु, डाळिंब या फळपिकांमध्ये ते चांगले यशस्वी होते. या तंत्रज्ञानाने जुनी अनुत्पादित बाग उत्पादित करणे शक्य होते. बागेचे पुनरूज्जीवन करण्यासाठी खाली नमूद केलेल्या बाबींचा अवलंब करावा.
आंबा- आयुष्यमान झालेल्या जुन्या झाडांच्या मुख्य फांद्या ठेऊन छाटणी करणे. जातीनुसार तीन ते सहा महिन्यात नवीन फूट येेते. नवीन फुटीवर उत्कृष्ठ दर्जाच्या वाणांची फांदी कलम करणे. एक ते दीड महिन्यात कलम फाद्यांना फुट येते आणि त्या जोमाने वाढतात.
आवळा- आवळ्याच्या पुनरूज्जीवनासाठी चार ते सहा मुख्य फांद्या ठेवून छाटणी करावी. वाणामध्ये बदल करावयाचा असल्यास नवीन येणार्या फुटीवर कलम बांधणे. तोच वाण ठेवायचा असल्यास नवीन फुटीवर कलम बांधण्याची गरज नाही.
पेरू- पेरू फळबागेचे पुनरूज्जीवन करण्यासाठी जमिनीपासून १ ते १.५ मीटर अंतरावर मुख्य फांदी छाटून नवीन फूट उद्यीप्त करावी. हे काम एप्रिल-मे महिन्यात करावे. पावसाळ्याच्या सुरूवातीला नवीन फूट जोमाने वाढते. नवीन आलेल्या फांद्या ऑक्टोबर महिन्यात अर्ध्या लांबीच्या अंतरावर पुन्हा छाटाव्यात. यामुळे झाडाची वाढ सुडोलपणे होते. फळे नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत उपलब्ध होतात. त्यानंतरच्या काळात प्रत्येक वर्षी अल्प प्रमाणात छाटणी करावी. छाटणीनंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड बुरशीनाशक ०.३ टक्के फवारावे. तसेच झाडाच्या मुख्य खोडास बोर्डोपेस्ट किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईडची पेस्ट लावावी.
लिंबू- लिंबामध्ये पुनरूज्जीवन करण्यापूर्वी सर्व वाढलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात. त्यानंतर जमिनीस टेकलेल्या किंवा वेड्यावाकड्या वाढ झालेल्या फांद्या मुख्य खोडापर्यंत २ फूट भाग ठेवून छाटाव्यात. असे केल्याने लिंबाचे झाड चांगल्या प्रकारे वाढते व फळधारणा मिळते.
डाळिंब- मुख्या खोडाच्या ३ ते ४ फांद्या १ ते १.५ मीटर उंचीवरून छाटून घ्याव्यात. संतूलित वाढ होण्यासाठी झाडावरील फांद्यांची योग्य निवड करावी. वाकलेल्या अर्धवट तुटलेल्या रोगग्रस्त फांद्या व जमिनीतून आलेली फूट पुर्णपणे छाटावी. मुख्य खोडास बोर्डोपेस्ट किंवा कॉपरऑक्सीक्लोराइेडच्या पेस्टचा थर द्यावा.
जुन्या बागांचे पुनरूज्जीवनाचे फायदे-
उपलब्ध झाडाचा सांगाडा तसेच पूर्ण वाढ झालेला मुळासहीत खुंट उपलब्ध असतो. त्यामुळे फळे त्याच वर्षी किंवा दुसर्या वर्षी लागतात. कमीतकमी वेळेत उत्कृष्ट जातीचे फळझाड तयार होते. झाडाची उत्पादकता व फळांचा दर्जा चांगल्या प्रतीचा मिळतो. झाड लवकर जोमाने वाढते.
मशागत व निगा-
पुनरूज्जीवन केल्यानंतर नत्र, स्फुरद, पालाश आणि सेंद्रिय खत याची पूर्ण वाढ झालेल्या झाडासाठी लागणारी खतमात्रा द्यावी. गरजेप्रमाणे व हंगामानुसार झाडास पाणीपुरवठा करणे. जोमाने वाढलेल्या फांद्या ठेवून कमकुवत फांद्या काढून टाकणे.
जुन्या बागांची काळजी-
- दाटीने वाढलेल्या फांद्या काढून टाकाव्यात.
- झाडाचा आकार व वाढ नियंत्रित ठेवणे.
- दरवर्षी योग्य प्रमाणात अनावश्यक फांद्यांची छाटणी करावी.
- सुक्ष्म द्रव्यांचा फवारा देणे. उन्हाळ्यात बागेची नांगरणी करणे.
निष्कर्ष
शेवटी, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा एक बहुआयामी प्रयत्न आहे जो पर्यावरण, स्थानिक समुदाय आणि अर्थव्यवस्थेसाठी अनेक फायदे देतो. दुर्लक्षित फळबागा पुनर्संचयित करून, आपण जैवविविधता टिकवून ठेवू शकतो, शाश्वत शेतीला चालना देऊ शकतो आणि ग्रामीण विकासाला पाठिंबा देऊ शकतो. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आपल्या सांस्कृतिक वारसा आणि पारंपारिक शेती पद्धतींशी पुन्हा जोडण्याची संधी देखील देते. शिवाय, जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनाचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. पुनर्संचयित फळबागा ताजे उत्पादन, मूल्यवर्धित उत्पादने आणि कृषी पर्यटन क्रियाकलापांच्या विक्रीद्वारे शेतकरी आणि ग्रामीण समुदायांसाठी उत्पन्नाचे स्रोत प्रदान करू शकतात. तथापि, जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकरी, संवर्धनवादी, धोरणकर्ते आणि स्थानिक समुदायांसह विविध भागधारकांकडून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. फळबागांच्या जीर्णोद्धाराच्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय बाबी विचारात घेणाऱ्या सर्वांगीण दृष्टिकोनाची मागणी करते.
श्री एस.बी.आगळे, कनिष्ठ संशोधक सहाय्यक,
श्री.एम.एस.सोनवणे, कृषि सहाय्यक,
कृषि तंत्र विद्यालय, धुळे